डिजिटल लॅब उद्घाटन आणि हस्तांतरण सोहळा
लोणावळा, (संपादक : संजय पालवे)
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पु. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील प्रांगणात 'Y4D' यांच्यातर्फे देण्यात आलेल्या डिजिटल संगणकीय लॅबचे उद्घाटन हस्तांतरण सोहळा पार पडला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उच्च स्थानी पोहोचवण्यासाठी संगणकीय ज्ञानाची गरज लक्षात घेऊन आणि प्रशालेतील विद्यार्थी संख्या डोळ्यासमोर ठेवून 'Y4D' संस्थेने शाळेला अत्याधुनिक डिजिटल संगणकीय लॅब उपलब्ध करून दिली.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी देश - परदेशामध्ये मोठ-मोठ्या पदावर कार्यरत आहेत. अशा सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संस्थेने विद्यालयाच्या प्रांगणात घडून आणला यामध्ये काही माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन मेळावा यशस्वी केला. मेळाव्यासाठी देशातून व परदेशातून जवळ-जवळ दोन हजार माजी विद्यार्थी उपस्थित होते. आणि या मेळाव्या मध्ये डिजिटल लॅबची संकल्पना उदयास आली. अशा प्रकारची लॅब शाळेला मिळवून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
डिजिटल लॅबचे उद्घाटन व हस्तांतरण सोहळा पार पाडण्यासाठी विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजय भुरके आणि नियामक मंडळ सदस्य आणि शाला समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी भूषवले. तसेच कार्यक्रमासाठी नियामक मंडळ सदस्य श्री.अरविंदभाई मेहता, ॲड.संदीप अग्रवाल, शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई टेलर, श्री.गिरीश पारेख, श्री.राजेश मेहता, प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापिका श्रीम.सुनिता ढिले, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीम.क्षमा देशपांडे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांच्या मानवंदनेने आणि बँड पथकाने केले.
डिजिटल लॅब हस्तांतरण ज्या प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते झाले. 'Y4D' फाउंडेशनचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार निकम, अरुण घोलप, राहुल पाटील, बिजेशकुमार, आदित्य देशमुख माजी विद्यार्थ्यांमधून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपस्थित असणारे बाळासाहेब पायगुडे, उमेश तारे, रमेश लूनावत, दिलीप लोंढे, सुरेश गायकवाड, योगिता कोकरे, दत्ता येवले (नगरसेवक आणि आर्किटेक), ललित सिसोदिया (नगरसेवक) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रतिनिधी श्री.अनिल खामकर, प्रास्ताविक आणि पसायदान श्रीम.सुनीता ढिले, स्वागतगीत आणि ईशस्तवन श्री.धनंजय काळे, पाहुण्यांचा परिचय श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, आभार श्री.विजय रसाळ यांनी मानले. डिजिटल लॅबची सजावट विद्यालयातील चित्रकला शिक्षक श्री.चंद्रकांत जोशी, श्री.महेश चोणगे, श्री. योगेश कोठावदे आणि विक्रम शिंदे यांनी केली. प्रशालेच्या सेवक वर्गाने कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अमूल्य योगदान दिले.