जवानांकडून देश संरक्षणाबरोबरच पर्यावरणाचे रक्षण
मळवली, संपादक : संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभा, पुणे संचलित श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच श्री विद्या बालक मंदिर, भाजे शाळेच्या प्रशस्त मैदानामध्ये सीआरपीएफ पुणे 242 बटालियन चे कमांडंट श्री पारस नाथ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सीआरपीएफने यावर्षी 14 हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. त्याच अनुषंगाने भाजे हायस्कूलमध्ये सुमारे 80 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.प्रसंगी सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट श्री कृष्णकांत झा साहेब व सीआरपीएफ चे 242 बटालियनचे असिस्टंट कमांडंट श्री अमित आखारे सर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. माननीय श्री पारस नाथ साहेब , श्री कृष्णकांत झा साहेब व श्री अमित आखारे सर यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण रक्षण व संवर्धन यांचे महत्त्व विशद केले तसेच झाडे लावण्याबरोबर झाडे जगवली पाहिजेत यावर विशेष भर दिला. कार्यक्रमासाठी वि.प्र. सभेच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ विद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर सरांनी मार्गदर्शन करीत शाळेचा इतिहास सांगितला.
संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी व सहकार्यवाह श्री.विजय भुरके यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगितले. तसेच शाला समिती सदस्य श्री उस्मान इनामदार साहेब कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी व मळवली पंचक्रोशीतील प्रसिद्ध उद्योजक श्री.विजय तिकोणे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रसंगी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर श्री. विजय उपाध्ये आणि सीआरपीएफ 242 बटालियनचे सुमारे 40 जवान त्यांच्या कुटुंबीयांसह कार्यक्रमासाठी उपस्थित होते. प्रशालेचे प्राचार्य श्री.संतोष पवार व श्री विद्या बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ.स्वाती रगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशालेचे पर्यवेक्षक मकरंद गुर्जर यांनी केले. फलक लेखन व सुंदर सजावट प्रशालेतील कलाशिक्षक धुळाजी देवकाते, विजय कवडे, सीमा सिंग, सुषमा येवले, काजल रणदिवे, शिल्पा आंबेकर व अनुजा वाघमारे यांनी केली. प्रशालेतील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींनी सुरेल आवाजात ईशस्तवन व स्वागतगीत सादर करीत कार्यक्रमाची प्रसन्न सुरुवात केली. आलेल्या सर्व मान्यवरांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले व पारंपारिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यामध्ये गहिनीनाथ बारगजे, संभाजी तुपे, कविता गायकवाड, पर्यावरण समिती प्रमुख बाळासाहेब कोकणे, सुरेखा अहिरे, ललिता पवार, राजेंद्र होले, प्रशांत घाडगे, परमेश्वर खाटपे, मुकुंद भोसले, बाळू शिरसाट, देविदास खेडकर, गणेश गायकवाड, मनीषा जगताप व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी परिश्रम घेतले. ध्वनि व्यवस्था श्रीराम तांदळे यांनी चोख बजावली. रोहिदास डिकोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.