'हसत खेळत तणावमुक्तती' कार्यक्रमात शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

लोणावळा, संपादक : संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून, त्यानिमित्त नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी आणि सहकार्यवाह विजय भुरके यांच्या प्रेरणेने आणि नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती सदस्य श्री.भगवानभाऊ आंबेकर यांच्या प्रयत्नाने शिक्षकांसाठी लेजेंड्स ऑफ लोणावळा आणि श्री.अशोक देशमुख यांचा 'हसत खेळत तणावमुक्तती' कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेच्या प्रकाश हॉल मध्ये करण्यात आले.   
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर होते. तसेच कार्यक्रमासाठी नियामक मंडळ सदस्य श्री संदीप आगरवाल, प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, उपमुख्याध्यापिका सौ.सुनीता ढिले, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका सौ.क्षमा देशपांडे, वरिष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर, श्री.सुरेश गायकवाड, श्री. रमेशशेठ लुनावत, शाळा समिती सदस्य श्री.राजेश मेहता, श्री.नंदकुमार वाळुंज, श्री.रामदास दरेकर, सौ.उमाताई मेहता, सौ.मनीषा गायकवाड उपस्थित होते.
      दीड तास चाललेल्या कार्यक्रमांमध्ये श्री.अशोक देशमुख यांनी शिक्षकांना पूर्ण वेळ खेळून ठेवले होते. कार्यक्रमात शिक्षक आपले दैनंदिन विचार पूर्ण विसरून खळखळून हसत होते. शिक्षक आपल्या जीवनातील तणाव, विचार आणि दुःख विसरून गेले होते. प्रत्येक शिक्षकाच्या चेहऱ्यावरती आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होता. आनंदी आणि तजेलदार राहण्यासाठी श्री.देशमुख यांनी काही मूलमंत्राबरोबरच प्राणायाम आणि योगासने यांचे महत्त्व शिक्षकांना पटवून दिले.
     कार्यक्रमाची सुरुवात श्री.धनंजय काळे यांच्या इशस्तवनाने झाली. प्रास्ताविक श्री.विजय रसाळ यांनी केले. श्री.सोमनाथ ढुमणे यांनी आपल्या ओघवत्या शैलिने सूत्रसंचालन केले, तर आभार नियामक मंडळ सदस्य श्री.संदीप आगरवाल यांनी मानले.
     

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा