प्रशालेमध्ये 'आंतरराष्ट्रीय स्कार्फ डे' साजरा

लोणावळा, संपादक : संजय पालवे
     विद्या प्रसारिणी सभेचे व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालय लोणावळा मध्ये 'आंतरराष्ट्रीय स्कार्फ डे' साजरा करण्यात आला. 
     कार्यक्रम विद्या प्रसारिणी सभेचे नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांच्या प्रेरणेने तसेच प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर उपमुख्याध्यापिका सौ. सुनीता ढिले, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका सौ.क्षमा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी श्री.अनिल खामकरआणि वरिष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
     स्काऊट आणि गाईड शिक्षक श्री.संजय पालवे यांनी विद्यार्थ्यांना स्कार्फ चे महत्व, बांधणी, सत्कृत्य गाठ कशी करावी आणि तिचे महत्त्व काय आहे याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी स्काऊट आणि गाईड शिक्षक श्री.गंगाधर गिरमकर आणि सौ.वैशाली तारू यांचे सहकार्य मिळाले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव