स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत प्रशालेत चांद्रयानाची प्रतिकृती उभारली
लोणावळा, संपादक : संजय पालवे,
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.
एस हायस्कूल व द.पू मेहता कनिष्ठ महाविद्यालय लोणावळा मध्ये यंदाचा 77वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. यंदाचे ध्वजारोहण नवनिर्वाचित नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांच्या हस्ते झाले.
नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष नियामक मंडळ सदस्य आणि समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर तसेच शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री.राजेश मेहता, प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती. सुनीता ढिले, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, बीसीएस महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.भगत सर, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर पर्यवेक्षिका श्रीमती.क्षमा देशपांडे, मराठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.मंगल जाधव, इंग्लिश प्राथमिक विभागाच्या श्रीमती.भारती लोखंडे, श्रीमती.अन्नपूर्णा सूर्यवंशी, शिक्षक प्रतिनिधी श्री.अनिल खामकर वरिष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, श्री.धनंजय काळे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.रवी दंडगव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजाला मानवंदना देण्यासाठी खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस अधिकारी श्रीमती.सीमा चौधरी, श्री.गुलाब पाटणकर, श्री.राजेंद्र कुळसंगे, श्री.इरफान शेख आणि त्यांची तुकडी प्रशालेमध्ये उपस्थित राहिली.
वरूण राजाच्या उसंतीमुळे कार्यक्रमाला छानसी रंगत आली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वज पूजन आणि ध्वजारोहनाने झाली, लगेचच खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील महिला पोलीस प्रशिक्षणार्थीनी मानवंदना दिली. प्रशालेतील स्काऊट आणि गाईड विभागातर्फे ध्वजाला व उपस्थित मान्यवरांना बँड पथकाच्या तालावर मानवंदना देण्यात आली आणि त्यांना स्काऊट आणि गाईड शिक्षक श्री.गंगाधर गिरमकर, श्रीमती.वैशाली तारु, श्रीमती.रेवती बोके आणि श्री.श्रीकांत म्हसकर यांनी केले.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे समूहगीते सादर केली. पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग संघातर्फे आयोजित ' वेटलिफ्टिंग ' स्पर्धेमध्ये प्रशालेतील विद्यार्थिनी प्रीती दुडे हिने 'गोल्ड मेडल' प्राप्त केल्याबद्दल तसेच मराठी मालिकेमध्ये बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या ' सृष्टी माने ' दोघींचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण कु.संस्कृती कालेकर विद्यार्थिनी सादर केलेले संस्कृत भाषेतील भाषण आणि कलाशिक्षक श्री.महेश चोणगे, श्री.चंद्रकांत जोशी, श्री.विक्रम शिंदे आणि श्री.योगेश कोठावदे यांनी तयार केलेल्या चांद्रयानाची प्रतिकृती ठरली.