विद्यार्थी आणि शाळा गुणगौरव समारंभ संपन्न

लोणावळा, संपादक : संजय पालवे
      विद्या प्रसारिणी सभेतर्फे व्ही.पी एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालय लोणावळा प्रशालेमध्ये विद्यार्थी व शाळा गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी दहावी व बारावी मध्ये प्रथम येणाऱ्या आणि 85 टक्के पेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभाचे आयोजन सभे तर्फे करण्यात येते.  याही वर्षी संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षा चे औचित्य  साधून विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन प्रशालेत करण्यात आले.
   विद्या प्रसारिणी सभेच्या भारत इंग्लिश स्कूल पुणे, शेठ हिरालाल प्रशाला पुणे, व्ही.पी.एस हायस्कूल लोणावळा, श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय मळवली - भाजे ठिकाणी हायस्कूल बरोबर कनिष्ठ महाविद्यालय ही संलग्न आहेत. या सर्व विद्याशाखेमधून विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा  पार पडत असतो.
      सन्मान सोहळा आयोजित करण्याचा मान यावर्षी व्ही.पी.एस हायस्कूलला प्राप्त झाला. संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त हा सन्मान प्राप्त होणे एक भाग्यच. 
     कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे यांनी भूषवले. कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यवाह डॉ. सतीश गवळी यांनी आपल्या प्रास्ताविका मधून संस्थेचा इतिहास सर्वांसमोर मांडला, सहकार्यवाह श्री. विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, श्रीमती. रूपमती जॉली आणि मा.नगरपरिषद अध्यक्षा श्रीमती सुरेखा जाधव, नियामक मंडळ सदस्य अरविंदभाई मेहता, नियामक मंडळ सदस्य संदीप आगरवाल यांनी  अध्यक्षा आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला, मा. नगरसेवक जितेंद्र जाधव, श्री.प्रमोद कुदळे, श्री.धीरूभाई कल्याणजी, श्री.राजेश मेहता, श्रीमती विशाखा भुरके, श्री.निखिल भुरके, श्री.नितीन गरवारे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संस्थापर्यवेक्षक श्रीमती पूजा भुरके उपस्थित होते.
     विद्यार्थी सन्मान सोहळ्यामध्ये दहावी मधून विद्यालयात प्रथम आलेले कु. माया पिंगट (90.80 %) व्ही.पी एस हायस्कूल लोणावळा, चि.अनिकेत कलंगे (92.40%)विद्यावर्धिनी इंग्लिश मीडियम पुणे, कु.पल्लवी गोरे (97.80%) भारत इंग्लिश स्कूल पुणे, कु.धनश्री शेलार(86.80%) श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय मळवली तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील कु.सेजल चौधरी(93.17%) (विज्ञान शाखा), कु.मान्यता व्यास(92.83%) (वाणिज्य शाखा) द .पू. मेहता ज्यु. कॉलेज लोणावळा, अथर्व कस्तुरे (91.33%) भारत इंग्लिश स्कूल पुणे, कु.प्राची व्यवहारे (83.50%) विद्यावर्धन इंग्लिश मीडियम पुणे वरील विद्यार्थ्यांनी प्रथम येण्याचा सन्मान मिळवला.
     सभे तर्फे सर्वाधिक निकाल आणि सर्वाधिक 85% पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी असणाऱ्या शाळेला फिरता करंडक दिला जातो यंदा हा मान भारत इंग्लिश स्कूल आणि विद्या वर्धीनी स्कूल यांना प्राप्त झाला.
     विद्यार्थी गुणगौरव समारंभ आणि करंडकाच्या वितरणानंतर सन्माननीय  उपस्थितांची मनोगते झाली. मा.नगराध्यक्षा श्रीमती सुरेखा जाधव यांनी म्हटले की, व्ही.पी.एस हायस्कूल मावळ तालुक्यातील सर्वात मोठी शाळा असून सर्वाधिक विद्यार्थी शाळेत शिक्षण घेतात शाळेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. श्रीमती जॉली मॅडम यांनी आपल्या मनोगत मधून विद्यार्थ्यांना सामाजिक ऋण फेडण्याची जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडावी याविषयी मार्गदर्शन केले.
     कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ. मृणालीनी गरवारे यांनी विद्यार्थ्यांचे व करंडक प्राप्त शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेची आणि सर्व विद्या शाखेंची भरभराट नियामक मंडळातील सर्व सदस्यां समवेत व सहविचाराने कशा पद्धतीने केली जाईल याची रूपरेषा मांडली.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सोमनाथ ढूमणे, स्वागतगीत व ईशस्तवन श्री.धनंजय काळे, विद्यार्थी यादी वाचन श्री.विठ्ठल खेडकर, पाहुण्यांचा सत्कार समारंभ प्रशालेचे वरिष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर यांनी पाहिले, आलेल्या मान्यवरांचे आभार नियामक मंडळ सदस्य आणि सकार्यवाह श्री.विजय भुरके यांनी मानले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव