रस्त्यावर चिखल आणि घरातील पाण्याची भांडी कोरडी

तळेगांव दाभाडे, संपादक : संजय पालवे
       तळेगाव परिसरातील मनोहरनगर ते जुनी भाजी मंडई परिसरामध्ये रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच त्यामध्ये आणखी भर म्हणजे गेल्या तीन - चार दिवसापासून परिसरात पाणी येत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
     पुणे आणि मुंबई दरम्यान तळेगाव दाभाडे मध्यवर्ती ठिकाण आहे. राहण्यासाठी अतिशय सुंदर, प्रदूषण विरहित, शिक्षण, आरोग्याच्या उत्तम सुविधा आणि पुण्यापासून तीस पस्तीस किलोमिटर अंतरावर असल्यामुळे पुणे, मुंबई, तळेगाव आणि चाकण एमआयडीसी मध्ये काम करणारे चाकरमारी या ठिकाणी राहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पसंती देतात. परंतु विविध कामासाठी रस्त्याच्या कडेने खोदकाम केले जाते. नंतर तिच माती रस्त्यावर येते आणि त्याचा चिखल तयार होतो. रस्त्याने पायी चालणाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. कित्येक पायी चालणारे नागरिक तसेच सायकल चालवणारे मुले रस्त्याला घसरून पडतात. विजेची जाण्याची आणि येण्याची वेळ अनिश्चित असल्यामुळे नागरिक हैराण आहेत.
     स्थानिक प्रशासनाने सर्व परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून प्रकर्षाने केली जात आहे.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव