रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात आजी-आजोबा झाले भावूक
लोणावळा, संपादक: संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल आणि द. पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधन उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
प्रशालेच्या स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थिनींनी स्वामी रामानंद ट्रस्ट वरसोली या ठिकाणी असलेल्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन तेथील आजी-आजोबांना राख्या बांधून रक्षाबंधन उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला. विद्यार्थिनींनी याप्रसंगी आजी-आजोबांना औक्षण केले, राखी बांधून व पेढा भरून त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रसंगी आजी-आजोबांनी देखील विद्यार्थिनींना भरभरून आशीर्वाद दिले आणि खूप शिकून देशाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली.
दरवर्षी प्रशालेतील स्काऊट-गाईडच्या विद्यार्थिनी पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा, शहरी पोलीस स्थानक लोणावळा, अंध वृद्धाश्रम खंडाळा या ठिकाणी जाऊन अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करतात. यंदाही वरसोली या ठिकाणी असलेल्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन विद्यार्थिनींनी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.
कार्यक्रमाची प्रेरणा नियामक मंडळ अध्यक्ष श्रीमती.मृणालिनी गरवारे, कार्यवाह श्री.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांच्याकडून मिळाली. कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती.सुनिता ढिले, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर पर्यवेक्षिका श्रीमती.क्षमा देशपांडे, ग्रंथालय प्रमुख श्रीमती.संजीवनी आंबेकर, मुख्य लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, वरसोली ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. राजू खांडेभरड उपस्थित होते.