प्रशाळेत क्रांती दिनाबरोबर आदिवासी दिन साजरा
लोणावळा, संपादक : संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रांती दिना बरोबरच आदिवासी दिन दिमाखात साजरा करण्यात आला.
9 ऑगस्ट क्रांती दिन आणि आदिवासी दिनाचे औचित्य साधून सकाळपासूनच प्रशाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेची सामूहिक शपथ मैदानावर देण्यात आली. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. हरिभाऊ कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांकडून शपथ वदऊन घेतली.
नियामक मंडळ सदस्य व शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर आणि प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये करण्यात आले. कार्यक्रमासाठी इयत्ता आठवी आणि नववी वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांनी मशाल पेटवून तसेच पर्यवेक्षिका श्रीमती.क्षमा देशपांडे यांच्या प्रास्ताविकेने आणि श्री.धनंजय काळे यांच्या स्वलिखित गीताने झाली.
संस्कृती कालेकर, समीक्षा दळवी, आचल मौर्या, आदिती कदम, तनिष्का गायकवाड, सुकन्या येवले, गौरव गोणते, रेवती परदेशी, वैष्णवी शिंदे, पूजा जाधव, अदिती कदम, तनिष्का मांजरे विद्यार्थ्यांनी विविध गीते आणि मनोगते सादर केली शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.अलकनंदा पाटील यांनी विद्यार्थ्यांना क्रांती दिनाचे महत्व सांगत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती.सुनिता ढिले त्याचबरोबर पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ शिक्षक प्रतिनिधी व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.अनिल खामकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संजय पालवे तर आभार श्रीमती.सुरेखा परदेशी यांनी मानले. कार्यक्रमाची व्यवस्था श्रीमती.संध्या रत्नाकर श्रीमती.मीना पराते आणि सेवक श्री.गजानन कदम यांनी चोखपणे पार पाडली