व्ही. पी.एस.मध्ये महिला सबलीकरना निमित्त सेमिनारचे आयोजन

लोणावळा, संपादक: संजय पालवे
         विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस. हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये महिला सबलीकरण निमित्त लायन्स क्लब ऑफ सुप्रीमो कडून प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये सेमिनारचे आयोजन करण्यात आले.
   दिवसेंदिवस महिलांवर अन्याय आणि अत्याचार होत आहेत. त्यानिमित्ताने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव होण्यासाठी आणि होणाऱ्या अन्यायाला सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी महिलांना कायद्याची आणि नियमाची जाणीव करून देण्यासाठी प्रशालेने घाट घातला.
     विद्या प्रसारिणी सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
     कार्यक्रमाची सर्वस्वी जबाबदारी व्ही.पी.एस चे बीसीएस आणि बीबीए महाविद्यालयाने पार पाडली. उपस्थितांना श्री. राजकुमार श्रीवास्तव, श्रीमती.जानवी म्हात्रे, श्री महेश आठवले यांनी मार्गदर्शन केले. महिलांवर कामाच्या ठिकाणी विविध प्रकारे अन्याय होतात आणि कशाप्रकारे होतात याची कल्पना त्यांनी करून दिली आणि त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमावलीची  माहिती सांगितली. महिलांनी विचारलेल्या विविध शंकांचे आणि प्रश्नांचे निरसन सर्व मान्यवरांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये करून दिले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी केले. उपस्थित पाहुण्यांचा परिचय उपमुख्याध्यापिका श्रीमती. सुनिता ढिले, पर्यवेक्षिका श्रीमती.क्षमा देशपांडे आणि शिक्षिका श्रीमती.मनीषा खेडकर यांनी करून दिले. कार्यक्रमासाठी नियामक मंडळ सदस्य श्री.संदीप आगरवाल, प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, बीसीएस विभागाचे प्राचार्य श्री.चंद्रशेखर भगत, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर उपस्थित होते.
     लायन्स क्लब ऑफ सुप्रीमो चे प्रेसिडेंट श्री. जयराम गौडा, श्री.अमितभाई वाडीवाला, श्रीमती. सुरैया वाडीवाला, श्री.विशाल पुटोळ आणि लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमती. बिंद्रा गणात्रा उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर यांनी आभार मानले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव