श्री गणरायाचे आगमन

    विद्या प्रसारिणी सभेचे,श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच श्री विद्या बालक मंदिर भाजे- मळवली यांच्या संयुक्त विद्यमाने  प्रशालेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणेशोत्सवानिमित्त श्री गणरायाचे आगमन ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले. 
    विद्या प्रसारिणी सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रेरणेने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयाची स्थापना श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 6 सप्टेंबर, 1991 रोजी झाली होती. 
आज शाळेचे 33व्या वर्षात पदार्पण होत आहे.  प्रशालेच्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांना तसेच आजी-माजी शिक्षकांना आणि असंख्य पालक व हितचिंतकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. 
      प्रशालेमध्ये विधिवत श्री गणरायाचे पूजन मा. प्राचार्य श्री संतोष पवार यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री मकरंद गुर्जर, कलाशिक्षक श्री धुळाजी देवकाते, बालक मंदिर च्या अध्यापिका काजल रणदिवे, श्री मुकुंद भोसले, श्री पवन घोरपडे व विद्यार्थी उपस्थित होते.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव