प्राथमिक विद्यालयात महाआरतीचे आयोजन
लोणावळा, संपादक : संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेचे व्ही.पी.एस. प्राथमिक विद्यालय लोणावळा शाळेत श्रीगणेशउत्सवा निमित्त महाआरती आणि श्री गणेश मूर्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगल जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गणपती बाप्पा कडे मागणे मागितले, हे बुध्दीची देवता गणपती बाप्पा सर्वांना बुध्दी दे, सर्वांना सुखी ठेव, शिकून मोठे होऊन देशाची सेवा करू दे.शाळेतील सर्व विद्यार्थ्यानी सामूहिक महाआरती सहभाग घेतला तर इ .4 थी च्या विद्यार्थ्यांनी माती पासून गणपतीच्या सुबक मूर्ती तयार करून रंगवून आणल्या होत्या. त्या श्रीगणेश मूर्तीचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा सौ .डॉ. मृणालिनी गरवारे, संस्थेचे कार्यवाह श्री. डॉ. सतीश भा. गवळी आणि सहकार्यवाह श्री. विजय भुरके यांनी सर्व विद्यार्थ्याना, शिक्षकांना श्रीगणेश उत्सवाच्या आणि महाआरती च्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक श्री . संजय भालचिम,श्री.प्रकाश पाटील,श्री. हनुमंत शिंदे, श्री.महादेव शिरसाट, श्री.बापूराव भोसले, श्री.अमित रसाळ,शिक्षिका सौ. मनिषा जरग , सौ.सुनिता वरे,सौ.आशा खामकर, सौ.संगिता पाटील,श्रीमती. स्वप्नाराणी भालेराव, शिक्षकेतर कर्मचारी श्री भिवाजी गायखे, श्रीमती.जयश्री बागलकोटे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महादेव शिरसाट यांनी केले तर आभार सौ. संगिता पाटील यांनी मानले...