व्ही.पी.एस.प्राथमिक मध्ये शिक्षकदिन उत्साहात

          विद्या प्रसारिणी सभेचे व्ही.पी.एस. प्राथमिक विद्यालय लोणावळा शाळेत सन 2023/24 या वर्षातील ५ सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील इ.4 थी तील विद्यार्थ्यानी इ.1 ली ते 4 थी  विद्यार्थ्यानी शिकवण्याचे काम केले. अगदी शिपाई काका देखील त्यातील एक विद्यार्थी झाला होता. शालेय कामकाज सुरू झाल्यापासून संपेपर्यंत  इ 4 थीतील विद्यार्थ्यानी पार पडले.
     आज शाळेत शिक्षक झालेल्या विद्यार्थ्याना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मंगल जाधव यांनी खाऊ आणि पेन दिले. शिक्षक दिन शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. शिक्षकांच्या समाजातील योगदानाची आठवण ठेवून शिक्षकांचा सन्मान करण्याचा दिवस. भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा 1962 पासून देशात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. 
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापिका सौ.मंगल जाधव उपस्थित होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून व्ही.पी.एस हायस्कूलचे शाळा समिती सदस्य श्री धीरूभाई टेलर उपस्थित होते. शिक्षक श्री.हनुमंत शिंदे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती सांगितली. त्यांचे बालपण त्यांचे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण याची माहिती सांगितली. तसेच 31 ऑक्टोबर 1961 रोजी राष्ट्रीय शिक्षक पारितोषिक वितरण समारंभात केलेल्या भाषणाचे वाचन करून दाखवले.
        समाजाच्या आणि आपल्या        व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत शिक्षकांचे अतिशय महत्त्वाचे योगदान असते. आई-वडिलांनंतर शिक्षक हेच पहिले गुरू असतात, जे आपल्याला योग्य-अयोग्य यातला फरक समजावून देतात. आपल्याला अक्षरे गिरवायला शिकवतात, आपल्या हिताचा विचार करतात, आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात. संस्थेचे नियामक मंडळाच्या अध्यक्ष्या सौ.डॉ.मृणालीनी गरवारे , कार्यवाह डॉ.श्री.स.भा.गवळी यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. 
      शाळेच्या शिक्षिका सौ. मनिषा जरग, सौ.सुनिता वरे, सौ.आशा खामकर, सौ. संगिता पाटील, श्रीमती. स्वप्नराणी भालेराव, श्री.संजय भालचिम, श्री. प्रकाश पाटील, श्री. हनुमंत शिंदे, श्री. महादेव शिरसाट, श्री. बापूराव भोसले, श्री. अमित रसाळ उपस्थित होते. सर्व शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षकेतर कर्मचारी श्री भिवाजी गायके आणि जयश्री बागलकोटे यांचे विशेष सहकार्य केले. सूत्रसंचलन श्री. संजय भालचिम यांनी केले तर आभार शिक्षक प्रतिनिधी सौ. सुनिता वरे यांनी मानले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव