व्ही.पी.एस. फार्मसी कॉलेज मध्ये जागतिक औषधनिर्मिती दिन साजरा

लोणावळा, संपादक: संजय पालवे
     विद्या प्रसारिणी सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणजे व्ही.पी.एस. फार्मसी कॉलेज ने प्रशालेच्या प्रकाश हॉल मध्ये जागतिक औषध निर्मिती दिन साजरा केला. 
    द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी सायन्स मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसमवेत झालेल्या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, व्ही.पी.एस फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. प्रिती मेश्राम, श्रीमती.कोळेकर, श्री. कल्याणकस्तुरे, प्रितिजा घोलप, स्वाती म्हस्के उपस्थित होते.
     नियामक मंडळ अध्यक्षा श्रीमती डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सकार्यवाह विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर, नियामक मंडळ सदस्य ॲड.श्री.संदीप अगरवाल यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत औषध निर्मिती क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
     फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या डॉ.प्रीती मेश्राम यांनी औषध निर्मिती क्षेत्रामधील माहिती विद्यार्थ्यांना देत सध्याच्या युगामध्ये औषध निर्मिती क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी कसे फायदेशीर राहील याची माहिती सांगितली.
     कार्यक्रम संपल्यानंतर फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक तसेच विद्यार्थी यांनी लोणावळा परिसरामधील मेडिकल यांना भेट देऊन मेडिकल चालकांना तुळशी रोपे व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या उत्तम कार्याबद्दल त्यांचे आभार मानले.

     
     

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा