भाजे शाळेत मातृदिन कार्यक्रम संपन्न

लोणावळा, संपादक : संजय पालवे
      विद्या प्रसारिणी सभेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व श्री विद्या बालक मंदिर भाजे-मळवली या दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे अतिशय सुंदर व हृद्य असा मातृदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. आपल्या भारतीय संस्कृतीच्या परंपरेनुसार मातृदेवो भव व पितृ देवो भव हे संस्कार पुढील पिढीमध्ये रुजावेत व घरातील सर्व ज्येष्ठ व्यक्तींच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
   विद्या प्रसारिणी सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे मॅडम, संस्थेचे कार्यवाह व शाला समितीचे अध्यक्ष डॉ. सतीश गवळी सर, संस्थेचे सहकार्यवाह श्री विजय भुरके सर, शाला समितीचे सदस्य श्री उस्मान इनामदार, श्री भगवान आंबेकर व श्री प्रमोद कुदळे सर्वांच्या प्रेरणेने मातृदिन कार्यक्रम संपन्न झाला.
      शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता शाळेत मातृदिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
मागील वर्षी वार्षिक परीक्षेत प्रथम पाच आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे पूजन व औक्षण पाल्यांच्या हस्ते करण्यात आले. पालकांचा शाळेतर्फे तुळशीचे रोप व श्रीफळ देऊन सहकारी शिक्षकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. औक्षण व पूजन सुरू असताना प्रशालेचे पर्यवेक्षक श्री मकरंद गुर्जर यांनी विद्यार्थ्यांसह श्रीसूक्तम् व नारायणोपनिषद या दोन्ही संस्कृत स्तोत्रांचे पठण केले. त्यामुळे प्रसन्न वातावरण निर्मिती झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन संकष्टी केदारी व प्राची कदम या प्रशालेतील 10वी च्या विद्यार्थीनींनी केले. कार्तिकी गायकवाड व वैष्णवी केदारी, तबलावादक ओम केदारी या विद्यार्थ्यांनी आईची महती सांगणारी सुंदर गीते संगीताच्या तालावर सादर केली. श्री विद्या बालक मंदिर च्या छोट्या चमूंनी देखील आई-वडिलांचे महत्व सांगणारे समूहगीत सादर केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी आई-वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी मनोगते व्यक्त केली.
तसेच शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावीच्या सुमारे 700 विद्यार्थ्यांना आपापल्या घरी सकाळी किंवा संध्याकाळी आई-वडिलांचे तसेच घरातील सर्व ज्येष्ठ व्यक्तींचे औक्षण करून त्यांना नमस्कार करावा असे आवाहन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. 
       घरामध्ये ज्येष्ठांचे औक्षण व नमस्कार करतानाचे फोटो  विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षकांना पाठविले. मातृदिनानिमित्त घरातील सर्व ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रति आदर व कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून हा सुंदर उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. या कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
     कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री संतोष पवार, विद्या बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ स्वाती रगडे, प्रशालेचे पर्यवेक्षक श्री मकरंद गुर्जर यांच्या नियोजनाप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री रोहिदास डिकोळे, सौ. सुरेखा आहिरे, सौ कविता गायकवाड, श्री गहिनीनाथ बारगजे, श्री मुकुंद भोसले, श्री बाळू शिरसाट, सौ. काजल रणदिवे, सौ शिल्पा आंबेकर, सौ सुषमा येवले तसेच सेवक श्री हनुमंत इंगवले, श्री नामदेव कडू, सौ. अलका अंबुरे, सौ राणी शेलार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. शिक्षक प्रतिनिधी श्री देविदास खेडकर व शिक्षकेतर प्रतिनिधी श्री जगन्नाथ दोरकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक वर्ग, पालक व माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
       श्री संदीप गायकवाड व सौ.  तिकोणे या पालक प्रतिनिधींनी मातृदिनाच्या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून शाळेचे आभार मानले. कार्यक्रमासाठी सुंदर सजावट व फलक लेखन कलाशिक्षक श्री धुळाजी देवकाते, श्री विजय कवडे, सौ. काजल रणदिवे ,सौ अनुजा वाघमारे, सौ सीमा सिंग यांनी केले. सांस्कृतिक समिती प्रमुख श्री रोहिदास डिकोळे यांनी आभार प्रदर्शन केले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव