व्ही.पी.एस मधील विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव
लोणावळा, संपादक: संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक दिना निमित्त तब्बल नव्वद विद्यार्थ्यांनी शिक्षक बनण्याचा अनुभव घेत अध्यापनाचा आनंद घेतला.
नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. श्रीमती.मृणालिनी गरवारे आणि नियामक मंडळ सदस्य तसेच शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांच्या संकल्पनेनुसार कार्यक्रमाची रूपरेषा सांस्कृतिक विभागाने ठरवली.
सांस्कृतिक विभागाने ठरवलेल्या नियोजनानुसार समिती प्रमुख तसेच शिक्षक प्रतिनिधी श्री.अनिल खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.संजय पालवे आणि श्री.धनंजय काळे यांनी पाचवी ते सातवी आणि श्री.वैभव सूर्यवंशी यांनी आठवी आणि नववी वर्गांसाठी विद्यार्थी निवड, विषय वाटप, आणि एक दिवसाचे वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना देण्यात आले.
मागील वर्षी इयत्ता नववीच्या वर्गामधील प्रथम पाच येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या दिवशी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक होण्याचा सन्मान मिळतो. यंदा शिक्षक दिना निमित्त मुख्याध्यापिका कु.सुप्रिया भानवसे, उपमुख्याध्यापिका कु.श्रावणी आखाडे, पर्यवेक्षक चैतन्य खारे आणि कु.सृष्टी हराळे तर सिद्धार्थ गवळी आणि गणेश पाठारे यांनी सेवक म्हणून आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली.
प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये विद्यार्थी शिक्षकांसाठी त्यांना आलेले अनुभव ऐकण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापनातील मजेशीर अनुभव सांगितले.
कार्यक्रमासाठी प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती.सुनिता ढिले, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, वरिष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.रवी दंडगव्हाळ उपस्थित होते. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिमा आणि फलक लेखन चित्रकला विभागातील श्री.चंद्रकांत जोशी, श्री.महेश चोणगे, श्री.विक्रम शिंदे, श्री.योगेश कोठावदे यांनी केले.
प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती.सुनीता ढिले आणि पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ यांनी विविध गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आस्था, कु. श्रुती सोनवणे, यादी वाचन श्रीमती.स्नेहलता कांबळे, श्रीमती.स्वाती व्हरांबळे आणि श्रीमती.ज्योती पाटील यांनी केले.
कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षकांच्या हस्ते शिक्षकांना तुळशीच्या रोपाचे वाटप करण्यात आले. उपस्थितांचे आभार श्री.अनिल खामकर यांनी मानले.