गायन स्पर्धेत भाजे हायस्कूलचा प्रथम क्रमांक

लोणावळा, संपादक: संजय पालवे 
        विद्या प्रसारिणी सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा माननीय डॉ. सौ. मृणालिनी गरवारे व कार्यवाह माननीय डॉ.श्री.सतीश गवळी, सहकार्यवाह माननीय श्री.विजय भुरके यांच्या प्रेरणेने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत ग्रामीण विभागात सहभाग नोंदविला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.   
      श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भव्य तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेमध्ये श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयाचा प्रथम क्रमांक आला आहे. विद्यालयाचे प्राचार्य श्री. संतोष पवार व पर्यवेक्षक श्री.मकरंद गुर्जर  यांनी सर्वांचे कौतुक केले. मार्गदर्शन करणाऱ्या सौ. कविता गायकवाड व श्री. मुकुंद भोसले यांचे अभिनंदन करण्यात आले. 

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव