भाजे हायस्कूल येथे दहीहंडी उत्सव आनंदात साजरा

लोणावळा, संपादक: संजय पालवे 
       विद्या प्रसारिणी सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. श्री सतीश गवळी आणि सहकार्यवाह श्री. विजय भुरके यांच्या प्रेरणेने विद्यालयातील दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
     भाजे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या पूजनाने झाली.  त्यानंतर श्रीकृष्णाष्टकम स्तोत्राचे संथा पद्धतीने पठण पर्यवेक्षक श्री मकरंद गुर्जर यांनी घेतले. इयत्ता पाचवी ते दहावी च्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी दहीहंडीस सलामी दिली. इयत्तेनुसार सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता. विशेषतः कार्यक्रमात मुलींचाही सहभाग होता. मुलींनीही थर रचून दहीहंडीस सलामी दिली.
     विद्यालयातील इयत्ता नववीतील विद्यार्थी सार्थक तिकोणे या विद्यार्थ्याने श्रीकृष्णाच्या वेशभूषेत दहीहंडी फोडली.  विद्यार्थ्यांना गोपाळकाला वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष पवार  व पर्यवेक्षक श्री मकरंद गुर्जर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री .रोहिदास डिकोळे व श्री.धुळाजी देवकाते श्री . विजय कवडे, श्री. भोसले मुकुंद, सौ. सुरेखा आहिरे, सौ. कविता गायकवाड, श्री प्रशांत घाडगे, सौ मनीषा जगताप, श्री गहिनीनाथ बारगजे, श्री बाळू शिरसाट, श्री मनोहर भोसले, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी परिश्रम घेतले.