धनंजय काळे ठरले लायन्स क्लब ऑफ लोणावळा 'सुप्रीमोज ' चे आदर्श शिक्षक
लोणावळा, संपादक: संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती.सुनिता ढिले, शिक्षक श्री.धनंजय काळे, श्री.सचिन लांडगे, श्री.मुकुंद इनामदार यांना शिक्षकदिनाचे औचित्य साधत लायन्स क्लब ऑफ लोणावळा 'सुप्रीमोज' यांच्या कडून आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्कार प्राप्त सर्वच मान्यवर आपापल्या कार्यात तरबेज आहेत. यामुळेच सभेची प्रगती दिवसेंदिवस वाढतच आहे. श्री.धनंजय काळे हे सभेमध्ये तब्बल पंचवीस वर्षांपासून सेवा करत असून यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे आणि त्याचे विद्यार्थी विविध पदावर देशाची सेवा करत आहे. श्री.काळे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक असून गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करतात त्यांनी केलेल्या मदतीचा ते कोठेही गवगवा करत नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.
संगीताची आवड असल्यामुळे गाणे लिहिणे, कविता लिहिणे, गाण्यांना चाली लावणे असे विविध उपक्रम ते नेहमी शाळेत राबवत असतात. शाळेत त्यांच्यावर असलेली संगीत विभागाचे जबाबदारी सर सक्षमपणे पारपडतात. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन लायन्स क्लब ऑफ लोणावळा 'सुप्रीमोज' यांनी श्री.धनंजय काळे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले.