स्व. यशवंतराव पवार यांच्या स्मृतिंना उजाळा
संपादक: संजय पालवे
बिरदवडी (ता. खेड ) येथील ज्योतिबा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्व . यशवंतराव पवार यांचा तृतीय स्मृतिदिन २ ऑक्टोबर रोजी बा. मा .पवार माध्य. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बिरदवडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी स्व . यशवंतराव पवार यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल मान्यवरांनी मनोगतातून त्यांच्या गत आठवणींना उजाळा दिला .
प्रसंगी विद्यालयात यशवंत स्मृती सप्ताह घेण्यात आला. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रांगोळी, वक्तृत्व, निबंध, तसेच मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते यशवंत स्मृतिचिन्ह देण्यात आले . स्मृर्तिदिनानिमित्त कवी व लेखक श्री. मनोहर मोहरे यांनी स्व. यशवंतराव पवार यांचे जीवनकार्य व शैक्षणिक योगदान या विषयावर व्याख्यान दिले . यावेळी मोहरे म्हणाले ,अत्यंत प्रतिकुल परिस्थित बिरदवडी सारख्या खेड्यात शैक्षणिक संकुल उभारून स्व. यशवंतराव पवार यांनी गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील मुलांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश दिला. विशेषकरून मुलींच्या शिक्षणाची सोय झाली या सर्व प्रयत्नामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी प्रा.देवयानी मॅडम सावलीप्रमाणे मागे राहिल्या. पतीच्या जाण्याने न खचता संस्थेचे उत्तरदायित्व स्वीकारून समर्थपणे व पारदर्शकतेने कारभार सांभाळत असल्याचं कौतुक मोहरे सरांनी मनोगतातून केले.
कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा प्रा.श्रीमती. देवयानी पवार, सचिव श्री. ईशानदादा पवार, सहसचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. श्री.तानाजीभाऊ पवार, बिरदवडी गावचे सरपंच श्री.दत्ताशेठ गोतरणे , माजी सरपंच श्री.मोहनशेठ पवार , सामाजिक कार्यकर्ते श्री. एकनाथशेठ पवार , संस्थेच्या संचालिका कु.ईश्वरी पवार, पालक संघाचे उपाध्यक्ष श्री.मुस्तफा शेख, सदस्य श्रीमती.सारिकाताई काळडोके, विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते .
स्मृतिदिनानिमित्ताने शाळेजवळील चौकाला " स्व. यशवंतराव पवार चौक" , असे नाव देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते फलकाचे आनावरण करण्यात आले. यावेळी विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाच्या सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेच्या वतीने सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य श्री.विजय चव्हाण सर यांनी केले .मान्यवरांचा परिचय श्री. दादासाहेब ढाकणे सर यांनी केले. सूत्रसंचलन सौ.भामरे मॅडम यांनी केले तर आभार प्रा.श्रीमती निखाडे मॅडम यांनी मानले.