व्ही.पी.एस मध्ये रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

लोणावळा, संपादक: संजय पालवे
       विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालय  आणि बी.सी.एस. महाविद्यालयामध्ये लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजेंड्स ग्रुप तर्फे रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
     विद्या प्रसारिणी सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रशालेमध्ये वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजेंड्स ग्रुप आणि जनरल हॉस्पिटल तळेगांव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेमध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
      शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिबिर महत्त्वाचे व उपयोगी ठरले. सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत शिबिरामध्ये शेकडो विद्यार्थांच्या नेत्राची तपासणी करून त्यांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.
     रक्तदानाची सुरुवात पालक प्रतिनिधींपासून झाली. त्यानंतर शालेय कर्मचारी व बी.सी.एस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. रक्तदान करणाऱ्या सर्वच रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. शिबिराचे समन्वय म्हणून पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ यांनी जबाबदारी सांभाळली.
     शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर, शाळा समिती सदस्य श्री.राजेश मेहता, प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, बी.सी.एस. कॉलेजचे प्राचार्य श्री. चंद्रशेखर भगत, उपमुख्याध्यापिका श्रीमती सुनिता ढिले, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्रीमती क्षमा देशपांडे, वरिष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी श्री.अनिल.खामकर, श्री.सुरेश गायकवाड, श्री.विवेक घानेकर, श्री. रामदास दरेकर, श्री.नंदकुमार वाळंज, श्री.रमेश लूनावत, श्री.हेमंत आगरवाल, श्री.अमित आगरवाल, श्रीमती उमा मेहता आणि श्रीमती रोहिणी रसाळ उपस्थित होते.
      शिबिरासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा सहभाग पाहून उपक्रमासाठी नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. श्रीमती मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.श्री.सतीश गवळी, सकार्यवाह श्री.विजय भुरके आणि शाळा समिती सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी शालेय प्रशासनाला शुभेच्छा देऊन कौतुक केले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा