भाजे शाळेत महाभोंडल्याचे आयोजन

लोणावळा, संपादक:संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी सभेच्या गुप्ता विद्यालयामध्ये शाळेच्या मैदानावर विद्यार्थिनींसाठी महाभोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त अनेकविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. 
   श्री विद्या बालक मंदिर व श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भाजे- मळवली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने महाभोंडला आयोजित करण्यात आला. बालक मंदिर च्या शिक्षिका सीमा सिंग व काजल रणदिवे यांनी मुलगा-मुलगी भेदभाव नको याविषयावर आधारित सुंदर पथनाट्य छोट्या चमूंच्यासह सादर केले.
       बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती रगडे व प्रशालेचे प्राचार्य श्री. संतोष पवार यांनी पूजन केले. याप्रसंगी पर्यवेक्षक श्री. मकरंद गुर्जर, शिक्षक प्रतिनिधी श्री. देवीदास खेडकर, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री.जगन्नाथ दोरकर, सांस्कृतिक समिती प्रमुख श्री. रोहिदास डिकोळे, पोषण आहार समिती प्रमुख श्री.संभाजी तुपे, श्री.मनोहर भोसले, श्री.बाळू शिरसाट, श्रीमती शिल्पा आंबेकर, श्रीमती सुषमा येवले, श्रीमती सुरेखा अहिरे, श्रीमती ललिता पवार, श्रीमती कविता गायकवाड, श्रीमती अंजली आंबेकर,श्रीमती अनुजा वाघमारे, श्रीमती मनिषा जगताप,श्रीमती साक्षी आंबेकर,श्रीमती अश्विनी हुलावळे, श्री. मुकुंद भोसले, श्री. हनुमंत इंगवले, श्री. नामदेव कडू  उपस्थित होते. 
सर्व विद्यार्थीनींनी व शिक्षिकांनी मनसोक्त आनंद घेतला. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यासाठी सहकार्य केले. सांस्कृतिक समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव