महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
लोणावळा, संपादक : संजय पालवे,
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्या प्रसारिणी सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यालयामध्ये वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून प्रशालेमध्ये सांस्कृतिक विभागाकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, शाळा समिती सदस्य श्री.धीरुभाई कल्याणजी उपमुख्याध्यापिका श्रीम.सुनिता ढिले, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीम. क्षमा देशपांडे, लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजेंड्स ग्रुपचे अध्यक्ष श्री. सुरेश गायकवाड, श्री आनंद गायकवाड ( झोनल चेअरमन), श्री.अमित अगरवाल (ज्येष्ठ सदस्य) संस्कृती विभाग प्रमुख श्री.अनिल खामकर आणि श्रीम.सुरेखा परदेशी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या कु.संस्कृती कालेकर विद्यार्थिनीने भाषण सादर केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे श्री.धीरूभाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगत ते मिळवण्यासाठी भारताने दिलेले बलिदान विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रशालेचे पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ (उपाध्यक्ष लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजेंड्स ग्रुप) आणि आभार श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर यांनी मानले.