भाजे शाळेत मोठ्या आनंदात दीपोत्सव साजरा

लोणावळा,संपादक: संजय पालवे,
       विद्या प्रसारिणी सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच श्री विद्या बालक मंदिर, भाजे या दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 
   संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे मॅडम, संस्थेचे कार्यवाह डॉ. सतीश गवळी सर, सहकार्यवाह श्री विजय भुरके सर, शाला समितीचे सदस्य श्री उस्मान इनामदार साहेब, श्री भगवान आंबेकर सर यांच्या प्रेरणेने उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रशालेचे प्राचार्य श्री संतोष पवार व श्री बालक विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती रगडे, पर्यवेक्षक श्री मकरंद गुर्जर यांच्या नियोजनाप्रमाणे कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. 
     प्राचार्य श्री संतोष पवार व मुख्याध्यापिका सौ स्वाती रगडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर यांच्या हस्ते  पणत्यांची रोषणाई करण्यात आली.  कलाशिक्षक धुळाजी देवकाते, संभाजी तुपे, बाळू शिरसाट, बाळासाहेब कोकणे, गहिनीनाथ बारगजे,  विजय कवडे, मुकुंद भोसले, नामदेव कडू, जगन्नाथ दोरकर , हनुमंत इंगवले यांनी परिश्रम घेतले. शिक्षक प्रतिनिधी देविदास खेडकर, शिल्पा आंबेकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व बालक मंदिर शाळेचा सर्व स्टाफ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.         कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व प्रार्थनेने झाली. दीपोत्सवानिमित्त शालेय इमारतीला विद्युत रोषणाई करण्यात आली तसेच संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त पणत्यांच्या साह्याने रांगोळी व दिव्यांची आरास करण्यात आली. दिव्यांचे महत्त्व सांगणाऱ्या  संस्कृत श्लोकांचे पठण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक मकरंद गुर्जर यांनी केले. सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन व खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव