शतक महोत्सवी वर्ष दिमाखात साजरे

लोणावळा, संपादक : संजय पालवे
    विद्या प्रसारिणी सभेच्या शतक महोत्सव वर्षानिमित्त व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकाश हॉल या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    सभेची स्थापना 3 डिसेंबर 1923 साली झाली असून आज सभेच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण  झाली. या प्रदीर्घ काळामध्ये सभेने नेहमीच उल्लेखनीय कार्य केलेले आहे. सभेच्या पुणे, लोणावळा, वाकसई, आणि मळवली या ठिकाणी मिळून जवळपास  विविध 27 शाखा दिमाखात उभ्या असून प्रत्येक शाखेची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. प्रत्येक शाखेचे शाखाप्रमुख आपल्या विद्या शाखेच्या प्रगतीचा आलेख उंचावण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती डॉ.मृणालिनी गरवारे होत्या. तसेच मंचावर कार्यवाहक श्री.डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, श्री. प्रमोद कुदळे, श्री.अरविंदभाई मेहता,  ॲड.श्री.संदीप आगरवाल, शाळा समिती सदस्य श्री. धीरूभाई टेलर, श्री राजेश मेहता, श्री गिरीश पारख, श्री उस्मानभाई इनामदार, प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, गुप्ता विद्यालयाचे प्राचार्य श्री.संतोष पवार, बी.सी.एस कॉलेजचे प्राचार्य श्री.चंद्रकांत भगत, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.मंगल जाधव, प्राथमिक मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम च्या मुख्याध्यापिका सौ.भारती लोखंडे तसेच विविध शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रस्तावनेमधून संस्थेच्या स्थापने पासून ते आज पर्यंतच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. प्रास्ताविक सादर करत असताना श्री. आंबेकर सर यांचा सभेचे माजी अध्यक्ष कै. डॉ.गोवर्धन शिंगरे उर्फ बाबा आणि कै. बच्चुभाई पत्रावला यांच्या आठवणीने कंठ दाटून आला.
     सभेच्या कार्याच्या अहवालाचे वाचन श्री. हरिभाऊ कुलकर्णी यांनी आपल्या दमदार आवाजाने केले. अध्यक्षा आणि पाहुण्यांचा परिचय श्री. सोमनाथ ढुमणे तसेच पर्यवेक्षक श्री. मकरंद गुर्जर यांनी करून दिला.
     दर वर्षीप्रमाणे याही वर्षी संस्थेमधून आदर्श शिक्षक, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी यांना पुरस्कृत केले जाते. श्री.धनंजय काळे (व्ही.पी. एस हायस्कूल लोणावळा), श्री.कुंडलीक आंबेकर (वरिष्ठ लिपिक व्ही.पी.एस हायस्कूल लोणावळा), श्री गहिनीनाथ बारगजे (गुप्ता विद्यालय भाजे), श्री अनिकेत रासकर (व्ही.पी.एस मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल लोणावळा), श्री राकेश हेगडे (व्ही.पी.एस चे बीसीएस कॉलेज लोणावळा), हुसेन शेख (इंजिनिअरिंग कॉलेज लोणावळा वाकसई), तसेच प्रकल्पा साठी उत्तेजनार्थ श्रीमती शुभांगी कडू ( व्ही.पी.एस. हायस्कूल  लोणावळा ), श्री बापूसाहेब भोसले (व्ही.पी.एस प्राथमिक विभाग लोणावळा), श्री. गजानन कदम (सेवक व्ही.पी.एस हायस्कूल लोणावळा), श्री.भिवाजी गायखे ( प्राथमिक विभाग लोणावळा) यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्काराची यादी वाचन शिक्षक प्रतिनिधी श्री.अनिल खामकर यांनी केले.
     मान्यवरांच्या मनोगता मध्ये सभेचे कार्यवाह डॉ.श्री सतीश गवळी, नियामक मंडळ सदस्य श्री.संदीप आगरवाल यांनी  आपल्या मनोगता मधून सर्व उपस्थितांना शतक महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.
     अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना श्रीमती डॉ. मृणालिनी गरवारे यांनी सभेतील सर्व कर्मचाऱ्यांना शतक महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देत मनोगताला सुरुवात केली. त्यांनी सर्व उपस्थितांना विश्वास देत त्यांच्या प्रत्येक अडीअडचणी मध्ये पाठीशी उभे राहण्याचा विश्वास दिला आणि सभेसाठी जास्तीत जास्त वेळ देण्याची ग्वाही दिली.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गंगाधर गिरमकर यांनी केले. स्वागत गीत श्री धनंजय काळे यांनी सादर केले. पाहुण्यांचे स्वागत आणि चहा पान तसेच उपस्थितांना खाऊचे वाटप श्री.मुकुंद शिंदे, श्री.संजय पालवे, श्री. कुंडलिक आंबेकर, श्री.चंद्रकांत जोशी, श्री.योगेश कोठावदे, श्रीमती.सुनिता नाईक, श्रीमती.स्वाती व्हरांबळे, श्रीमती.अलकनंदा पाटील, श्रीमती.सुरेखा परदेशी, श्रीमती.वैशाली ढाकणे, श्रीमती.अश्विनी निबळे तसेच सेवक श्री.मुकुंद जगताप यांनी केले.
     उपस्थित मान्यवरांचे आभार पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे यांनी मानले. तसेच कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव