व्ही.पी.एस हायस्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची उधळण

लोणावळा, संपादक : संजय पालवे 
   विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू मेहता कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. सभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त प्रशालेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होते.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती. डॉ.मृणालिनी गरवारे होत्या. प्रमुख पाहुणे वरसोली येथील रामानंद शास्त्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.विनोद आग्रवाल, सेक्रेटरी श्री.विजयकुमार कुकरेजा, विश्वस्त श्रीमती. सुरेखा कुकरेजा उपस्थित होते. व्यासपीठावर सभेचे कार्यवाह डॉ.श्री.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर, श्री.अरविंदभाई मेहता, श्री.धीरूभाई कल्याणजी, ॲड.श्री.संदीप आगरवाल, श्री.गिरीश पारख, श्री.राजेश मेहता, श्री.राजू खांडेभरड, उस्मान इनामदार, श्री. नितीन गरवारे, श्री.निखिल कवीश्वर, पुणे ग्रामीण पोलीस कमांडो डॉ.जावेद सय्यद, श्री. संदीप मोरे उपस्थित होते.
   पाहुण्यांच्या हस्ते चित्रकला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन आणि संगणकक्ष यांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर तर वार्षिक अहवाल वाचन शिक्षक प्रतिनिधी श्री.अनिल खामकर यांनी केले. मागील वर्षांमध्ये इयत्तेत प्रथम, विषयांत प्रथम, दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यासाठी पारितोषिक समिती प्रमुख श्री.विठ्ठल खेडकर आणि  सहकाऱ्यांनी उत्तम नियोजन पार पाडले.
     उपस्थित मान्यवरांच्या मनोगता मध्ये शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी शाळेच्या प्रगतीचा वृत्तांत मांडला तसेच उपस्थित पाहुण्यांनी शाळेला केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले व शाळा प्रशासनाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.
     कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुण्यांमध्ये श्री. विनोद आग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना भरपूर शिक्षण घेऊन देशाची सेवा करण्याचे आवाहन केले. तसेच सुरेखा कुकरेजा यांनी त्यांना दिलेल्या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त करत शाळेची अशीच भरभराट व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली. कार्यवाह डॉ.सतीश गवळी यांनी सभेच्या कामाचा आढावा उपस्थित पाहुणे आणि पालकांसमोर मांडला.
     अध्यक्ष मनोगत व्यक्त करतांना डॉ. मृणालिनी गरवारे यांनी प्रथम पाहुण्यांचे स्वागत करत देणगीदारांचे आभार मानले. देणगीदारांनी दिलेल्या देणगीचे योग्य चीज करण्याचे आश्वासन दिले. तसेच कार्यक्रमाच्या  नियोजनाबद्दल सांस्कृतिक समिती, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्काऊट आणि गाईड स्वयंसेवक, विद्यार्थी यांचे कौतुक केले आणि कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
     कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण शिवराज्याभिषेक आणि तांडव नृत्य  राहिले. सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढुमणे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. सुरेखा परदेशी, कु.तनिष्का गायकवाड, कु. श्रुती सोनुने, कु. सिद्धी जायगुडे यांनी केले तर  उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे आभार पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर यांनी मानले.
   

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव