गुप्ता विद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न.
लोणावळा, संपादक संजय पालवे
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विद्या प्रसारिणी सभेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय, भाजे या शाळेत राष्ट्रीय बालिका दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेले कठोर परिश्रम कथन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संतोष पवार व पर्यवेक्षक श्री. मकरंद गुर्जर, शिक्षक प्रतिनिधी देविदास खेडकर व शिक्षकेतर प्रतिनिधी जगन्नाथ दोरकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. आर्या केदारी, दीक्षा केदारी, प्रांशू नागर ,आदित्य इकाळे, श्रावणी गायकवाड, अश्विनी अत्तरदे या विद्यार्थ्यांनी मनोगते सादर केली.
सांस्कृतिक समितीचे प्रमुख श्री रोहिदास डिकोळे यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाईंचा जीवनपट कथन केला. सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. देविदास खेडकर यांनी आभार मानले.