विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाला भेट
लोणावळा, संपादक:संजय पालवे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत बालेवाडी येथील क्रीडा संकुल येथे राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आली होते. प्रदर्शनाला व्ही.पी.एस हायस्कूल येथील जवळपास सत्तर विद्यार्थ्यांनी भेट दिली.
प्रदर्शन भेटीचा विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण होण्यासाठी खूप फायदा झाला. प्रदर्शनामध्ये औषधी प्रयोग, गणिती प्रयोग, पावन ऊर्जा (पवनचक्की), रेल्वे संबंधी प्रयोग, शेती संबंधित प्रयोग अशा विविध प्रयोगाची मांडणी करण्यात आली होती. सर्व प्रयोगाचे विद्यार्थ्यांनी बारकाईने निरीक्षण केले आणि माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
शैक्षणिक उपक्रमाला विद्या प्रसारिणी सभेच्या अध्यक्षा श्रीमती डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ श्री.सतीश गवळी, सहकार्यवाह विजय भुरके, नियमक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती सुनीता ढिले, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे यांची मार्गदर्शन मोलाचे ठरले.
शैक्षणिक भेटीचे नियोजन विज्ञान शिक्षक श्री. रवींद्र गोसावी, विज्ञान विभाग प्रमुख श्री. सुभाष क्षीरसागर, श्री.वैभव सूर्यवंशी आणि श्रीमती दुर्गा परिहर यांनी केले.