विद्यार्थांनी घेतले आत्मसंरक्षणाचे धडे
चाकण, संपादक: संजय पालवे
ज्योतिबा एज्युकेशन सोसायटीच्या बा. मा. पवार माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज बिरदवडी येथे दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी 9.30 ला दामिनी पथक चाकण पोलीस स्टेशन यांच्या वतीने मुलींसाठी आत्मसंरक्षण शिबिर संपन्न. संस्थेचे सचिव श्री ईशान दादा यशवंत पवार यांच्या 30 जानेवारी रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त काल विद्यालयातील इयत्ता 10वी विद्यार्थी विद्यार्थिनी यांना T.T. धनुर्वात मोफत लसीकरण आज विद्यार्थ्यांसाठी आत्मसंरक्षण प्रात्यक्षिक दाखवण्यात आली.
विद्यालयाचे श्री विजय चव्हाण, श्री दादासाहेब ढाकणे, श्री विजय पवार, श्री ज्ञानेश्वर चोपडे, श्री हर्षद सावंत, सौ निखाडे मॅडम सौ रेपाळे मॅडम एकूण विद्यार्थी संख्या 297 मुली 134 चाकण पोलीस स्टेशनच्या दामिनी पथक मधील सौ अर्चना भीमाशंकर हाडवळे मपोशी/629 डिंपल रामदास आदक/मपोशी3126 प्रियंका बाळासाहेब गिरी विद्यालयाचे माजी विद्यार्थी समाजसेवक श्री शांताराम गाडे विंग चुन असोसिएशन चे कोच श्री रामेश्वर चाहेल सर(छत्रपती संभाजी नगर) व त्यांचा स्टाफ यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षण कराटे प्रात्यक्षिके दाखवली आत्तापर्यंत यांनी साडेसहा लाख मुलांना कराटेचे सेक्शन दिले आहे.
दामिनी पथक मधील सर्वांचे व कोच श्री चाहेल सर व सर्वांचे स्वागत विद्यालयाच्या वतीने करण्यात आले अशी माहिती विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख श्री दादासाहेब ढाकणे यांनी दिली.