स्वामी विवेकानंद ग्रंथालयास पुस्तके भेट

लोणावळा, संपादक : संजय पालवे 
     विद्या  प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे अध्यक्ष नियामक मंडळाचे सदस्य आणि शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर होते.  
    सभेचे प्रास्ताविक शिक्षक प्रतिनिधी श्री. अनिल खामकर यांनी केले. सभेसाठी प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापिका श्रीमती.सुनिता ढिले, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती. क्षमा देशपांडे, प्रशालेचे मुख्य लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर उपस्थित होते.
      सहविचार सभेमध्ये प्राचार्य श्री. महिंद्रकर उपमुख्याध्यापिका श्रीमती.ढिले, पर्यवेक्षक श्री. गजेंद्रगडकर यांनी आपले मनोगते व्यक्त केली.
      अध्यक्षीय मनोगतामध्ये श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी प्रथम शाळेमध्ये चाललेले उपक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कष्टांबद्दल सर्व शिक्षकांचे कौतुक केले. त्याचबरोबर शिक्षकांना काही सूचनाही केल्या बोलताना ते म्हणाले की, शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रित असले पाहिजे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून त्याद्वारे विद्यार्थ्यांना स्वच्छतेची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे अपेक्षित आहे आणि तसेच बाहेरील वातावरणाचा अध्यापनावर व विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही याची खबरदारी सर्व शिक्षकांनी घेणे अपेक्षित आहे.
    कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती. संगीता कोल्हे यांनी प्रशालेच्या स्वामी विवेकानंद ग्रंथालयास काही पुस्तके भेट स्वरूपात दिली आणि सेवानिवृत्तीपर्यंत दरवर्षी अशीच नवनवीन पुस्तके भेटीच्या स्वरूपामध्ये दिले जातील असा शब्द दिला ग्रंथालय प्रमुख श्रीमती संजीवनी आंबेकर व ग्रंथालय सहाय्यक बाळू माने यांनी दिलेल्या भेटीचा स्वीकार केला.
      श्री गंगाधर गिरमकर, श्री संजय पालवे आणि श्री.सचिन लांडगे यांनी शिक्षकांचे काही प्रश्न अध्यक्षांच्या समवेत मांडली आणि अध्यक्षांनी देखील समस्येचे निराकरण करण्याचा शब्द दिला. सभेसाठी उपस्थितांचे आभार श्री.गजेंद्रगडकर यांनी मांनले.