गुप्ता विद्यालयामध्ये मराठी गौरव दिन साजरा
मळवली, संपादक : संजय पालवे विद्या प्रसारिणी सभेचे श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय मळवली (भाजे)मध्ये वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अश्विनी अत्तरदे व धनंजय यांनी केले. इयत्ता ५ वी ते ९ वी च्या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी उस्ताहाने सहभाग घेतला विविध नाटिका व पोवडा काविता मनोगते यातून मराठी भाषा व संस्कृतीचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मा.श्री.संतोष पवार भूषविले शिक्षक प्रतिनिधी श्री. देविदास खेडकर, शिक्षकेत्तर प्रतिनिधी श्री.जगन्नाथ दोरकर उपस्थित होते . तसेच जेष्ठ शिक्षक श्री.मनोहर भोसले यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे नियोजन व मनोगत सांस्कृतिक प्रमुख श्री.रोहिदास डिकोळे, यांनी केले . या कार्यक्रमाला श्री. राजेंद्र होले , श्री. संभाजी तुपे ,श्री.गहिनीनाथ बारगजे, श्री. बाळासाहेब कोकणे , श्री.विजय कवडे, श्री . धुळाजी देवकाते, श्री.जालिंदर बनकर , श्री . गणेश गायकवाड , सौ.सुरेखा आहिरे , सौ . कविता गायकवाड , सौ.ललिता पवार , सौ . दुर्गु डे, कु.अंजली आंबेकर कु. आंद्रे .श्री . मुकुंद भोसले, हनुमंत इंगवले या सर्वांचे सहकार्य लाभले.श्री.देविदास खेडकर यांनी सर्वांचे आभार मानले .