स्काऊट आणि गाईड विभाग
लोणावळा,
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूलमध्ये गेल्या 40 वर्षापासून स्काऊट आणि गाईड विभाग कार्यरत आहे. स्काऊट आणि गाईड विभागाची सुरुवात दिवंगत शिक्षिका सरला भोसले मॅडम यांनी केली. त्यानंतर विजयकुमार जोरी (माजी मुख्याध्यापक), संतोष तळपे सर, संजय पालवे सर, दीपक पिसे सर, गंगाधर गिरमकर सर आणि वैशाली तारु मॅडम शिक्षकांनी स्काऊट आणि गाईड विभाग सांभाळा.
स्काऊट आणि गाईड विभागातर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रक्षाबंधन, सर्वधर्म प्रार्थना, अंधदिन, एड्स दिन, स्वच्छता मोहीम, जनजागृती रॅली, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन यामध्ये बँड पथक आणि परेडचे नियोजन केले जाते. शासनाचे विविध कॅम्पस यामध्ये स्वयंसेवक म्हणून स्काऊट आणि गाईड विभागातील शिक्षक आणि विद्यार्थी सेवा करत असतात.
स्काऊट आणि गाईड विभागाकडून दरवर्षी शासनाला निधीच्या स्वरूपामध्ये नोंदणी शुल्क दिले जाते, तसेच खरी कमाई स्वरूपामध्ये हजारो रुपयांची खरी कमाई विद्यार्थी करून ती स्काऊट आणि गाईड विभागाच्या जिल्हा कार्यालयामध्ये जमा केली जाते.
स्काऊट आणि गाईड विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमामुळे व उपक्रमामुळे व्ही.पी.एस हायस्कूलचे राज्यभर नाव होते.
विभाग प्रमुख
श्री.संजय पालवे