व्ही.पी.एस मधील छोट्या शास्त्रज्ञांचा अविष्कार

लोणावळा, संपादक : संजय पालवे                  प्रशालेमध्ये विज्ञान दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरा झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती.सुनिता ढिले यांनी भूषविले होते.            कार्यक्रमासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री. मुकुंद शिंदे  प्रशालेतील सर्व विज्ञान शिक्षक व इयत्ता सहावी सातवी व आठवीचे विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित होते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध शास्त्रीय उपकरणांचे प्रदर्शन भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत अत्यंत सुनियोजित पद्धतीने मांडले होते विद्यार्थ्यांनी अत्यंत अल्पावधीमध्येच अत्यंत संशोधक वृत्तीने व विज्ञान शिक्षक श्रीमती.वैशाली ढाकणे, श्रीमती. म्हात्रे,श्रीमती. पराते, श्री.सुभाष क्षीरसागर,श्रीमती.शुभांगी कडू, श्रीमती.आशा दहिफळे, श्रीमती. पाटील, श्री.जयवंत सिसोदे, श्रीमती.म्हस्के, श्रीमती.बनकर, श्रीमती. वृषाली कांबळे, श्रीमती. शिर्के, श्रीमती. हुंबे अशा विविध शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुंदर उपकरणे तयार केली होती. 
   एका छोट्याशा रोपाला पाणी देऊन प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले, ही एक सुंदर कल्पना होती. प्रशालेचे विज्ञान विषय प्रमुख श्री क्षीरसागर सर व बैले मॅडम यांनी प्रकाश हॉलमध्ये कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर नियोजन केले होते. कार्यक्रमांमध्ये विज्ञान गीत, विज्ञानाचे महत्त्व, विज्ञान कथा, इंग्रजी व मराठी भाषेमधून सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती बैले मॅडम यांनी केले. 
   विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला अतिशय छान प्रतिसाद दिला अध्यक्षीय भाषणामध्ये, ढिले मॅडम यांनी, विद्यार्थ्यांना ,विज्ञानाचे महत्त्व तसेच विज्ञानाची व अध्यात्माची सांगड कशी घालायची ,विज्ञान म्हणजे काय, विज्ञानाचा माणसाच्या जीवनावर काय परिणाम होतो ,याबद्दल माहिती दिली तसेच' विज्ञान दिना 'निमित्त एक स्वरचित कविता ही त्यांनी सादर केली . अशा रीतीने प्रशालेत  विज्ञान दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साह पूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला .

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव