सावित्रीबाई फुले स्मृतिदिन आणि महिला दिन साजरा
लोणावळा, संपादक संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व ज्युनि. कॉलेज मध्ये महिला दिनाचा कार्यक्रम प्रकाश हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य मा. श्री. उदय महिंद्रकर , प्रमुख पाहुणे नियामक मंडळ सदस्य तथा शाला समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर , ॲड. श्री.संदीपजी अगरवाल, शाला समिती सदस्य श्री.धीरूभाई टेलर, श्री. राजेशजी मेहता , आणि उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे , उपमुख्याध्यापिका श्रीम. सुनिता ढिले, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, पर्यवेक्षिका श्रीम.क्षमा देशपांडे, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, शिक्षक प्रतिनिधी श्री.अनिल खामकर , कार्यालय अधिक्षक श्री.कुंडलीक आंबेकर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. ईशस्तवन धनंजय काळे यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय पालवे , श्री.श्रीकांत म्हसकर आणि श्री.सोमनाथ ढुमणे यांनी केले . श्री.कल्याण चौगुले, श्री.हरिभाऊ कुलकर्णी यांनी महिला दिनानिमित्त मनोगते, तसेच श्री. गंगाधर गिरमकर यांनी महिलांसाठी विशेष कविता सादर केली. त्यानंतर सर्व महिला शिक्षिका, शिक्षकेतर, सेविकांचा अध्यक्ष आणि पाहुण्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.श्रीमती. शुभांगी कडू यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी आणि अध्यक्षांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे आभार शिक्षक प्रतिनिधी श्री. अनिल खामकर यांनी मानले.
विद्या प्रसारणे सभेच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.श्री.सतीश गवळी सहकार्य श्री.विजय भुरके यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या