व्ही.पी.एस च्या विद्यार्थ्यांची यशाला गवसणी

लोणावळा, संपादक: संजय पालवे
      विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच लागलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये घवघवीत यश संपादन करून हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव उज्वल केले. परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता व्ही.पी.एस ने यंदाच्या निकालामध्ये अव्वल स्थान पटकावले.
     खेळ, विविध उपक्रम त्याचबरोबर अभ्यास याची सांगड घालताना विद्यार्थी आणि शिक्षक यांना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागते. हे सगळे असून देखील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक शाळेबरोबर लोणावळा परिसरातील पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर करत आहे.
     यावर्षी बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील मिळून 949 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते या पैकी 924 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा निकाल 97.57%  लागला. विज्ञान शाखेमध्ये आर्यन दळवी (91.17%), कृष्णा सुकुमारन(86.00%), तन्वी कालेकर (85.33%) इंग्रजी कॉमर्स शाखेतील यज्ञेश नाणेकर 89.17 %, ऋतुजा सूर्यवंशी 88.33%, स्नेहा सागर 87.83% तर मराठी वाणिज्य शाखेमधील तुषार गायकवाड 78.67%, प्रणव कडू 78. 58%, सुनिता घारे 78.33% गुण मिळवत आपापल्या शाखेमध्ये प्रथम क्रमांक पटकावले. एकूणच निकालातील अभिमानाची गोष्ट म्हणजे आर्यन दळवी विद्यार्थ्याने गणित विषयामध्ये शंभर पैकी शंभर गुण प्राप्त करून अव्वल राहिला.
      बारावी बरोबरच दहावीच्या निकालामध्ये देखील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. परीक्षेसाठी 325 विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी 302 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि शाळेचा एकूण निकाल 92.92% लागला.
      निकालामध्ये सुप्रिया भानवसे 93.20%, साक्षी सिंग 87.40%, आयेशा खान 87.20% कार्तिक शिंगारे 85.60%, निशा अगरवाल 84.20% गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले.
      व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शंभरापेक्षा जास्त आहे. मिळालेल्या यशाची दखल घेत विद्या प्रसारिणी सभेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजय भुरके, नियामक मंडळ सदस्य आणि शाला समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, उपप्राचार्य श्री.आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीम.क्षमा देशपांडे आणि ज्येष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.
     

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा