वाजत गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत
लोणावळा, संपादक: संजय पालवे.
नुकत्याच शंभरी पार केलेल्या विद्या प्रसारिणी सभेच्या लोणावळा येथील व्ही.पी. एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामधील इयत्ता पाचवी मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत यावर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले.
शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती अतिशय उत्कृष्ट होती. जवळपास दोनशे विद्यार्थी सेमी इंग्लिश व इंग्लिश मीडियम चे मिळून पहिल्याच दिवशी उपस्थित होते. प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर आणि पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ यांच्या सूचनेनुसार पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना लेखणी व पुस्तकाच्या सेटचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना श्री.संजय पालवे यांच्या मार्गदर्शनखाली वर्ग खोल्यापर्यंत स्काऊट आणि गाईड वाद्य पथकाद्वारे पोहोचवण्यात आले. प्रसंगी नवीन विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. अशा अनोख्या स्वागताने पालक व विद्यार्थी भारावून गेले.
अनोख्या उपक्रमाचे नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य आणि शाला समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई कल्याणजी यांनी कौतुक केले.
स्वागत प्रसंगी प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीम.क्षमा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी श्री.अनिल खामकर, ग्रंथालय प्रमुख श्रीम.संजीवनी आंबेकर, श्रीम.वैशाली तारू, ज्येष्ठ शिक्षक श्री. विठ्ठल खेडकर, श्री.मुकुंद शिंदे, श्री.जयवंत सिसोदे, श्री.महेश चोणगे, श्री. ज्ञानेश्वर बुरांडे, श्री.चंद्रकांत जोशी, श्री.योगेश कोठावदे, श्री.देविदास खेडकर, श्री.बाळू माने, श्रीम.आशा दहिफळे, श्रीम.वैजयंती जगताप, श्रीम.सर्जेराव, श्रीम.सुनीता बनकर, श्रीम.स्वाती व्हरांबळे, श्रीम.गौरी खंडेलवाल उपस्थित होते.