भाजे हायस्कूलमध्ये योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

मळवली, संपादक : संजय पालवे 
      विद्या प्रसारिणी सभेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भाजे-मळवली विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे व कार्यवाह डॉ. सतीश गवळी व सहकार्यवाह श्री विजय भुरके यांच्या प्रेरणेने कार्यक्रम संपन्न झाला
   सर्वांग सुंदर योग व व्यायामामुळे शरीर लवचिक व सशक्त बनते हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला.  प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, योगासने व प्राणायाम यांचा सराव केला. क्रीडा शिक्षक प्रशांत घाडगे व अश्विनी दुर्गुडे यांनी उत्कृष्ट नियोजन केले.
      प्रशालेचे प्राचार्य श्री संतोष पवार व पर्यवेक्षक मकरंद गुर्जर यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षकांच्या व शिक्षकेतर यांच्या सहकार्याने कार्यक्रम आखीव रेखीव व शिस्तबद्ध झाला.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस. हायस्कूलमध्ये पारंपरिक महाभोंडल्याचा उत्साहात जल्लोष

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा