बालगोपालांनी घेतले योगाचे धडे
लोणावळा, संपादक :संजय पालवे विद्या प्रसारिणी सभेचे व्ही.पी.एस प्राथमिक विद्यालय लोणावळा शाळेत जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला
इ. 1 ली ते 4 थी मधील विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, भुजंगासन, वृक्षासन यासारखी वेगवेगळी योगासने सादर केली. श्री.प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्याकडून योगाचे विविध प्रकार करून घेतले.मुख्याध्यापिका सौ. मंगल जाधव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
नियामक मंडळाच्या अध्यक्षा मा. डॉ. मृणालीनी गरवारे मॅडम,संस्थेचे कार्यवाह मा.डॉ.सतीश गवळी सर व श्री.विजय भुरके यांनी विद्यार्थ्यांना जागतिक योगदिन कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. योगदिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक श्री. संजय भालचिम, श्री. प्रकाश पाटील, श्री. हनुमंत शिंदे,श्री.अमित रसाळ, शिक्षिका सौ. मनिषा जरग, सौ. सुनिता वरे, सौ.निलीमा निकम , सौ. संगिता पाटील, सौ. कविता पुंगडवले श्रीमती स्वप्नाराणी भालेराव , सौ. प्राजक्ता दिवसे या शिक्षकांनी मेहनत घेतली.