महाकवी कालिदास जयंती संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा

लोणावळा, संपादक:संजय पालवे 
    आषाढस्य प्रथम दिवसे... अर्थात आषाढ महिन्यातील पहिला दिवस हा महाकवी व महान संस्कृत पंडित कालिदास यांची जयंती हा दिवस संस्कृत दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. विद्या प्रसारिणी सभेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ  महाविद्यालय, भाजे-मळवली या विद्यालयात संस्कृत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला   
   संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे , कार्यवाह डॉ. सतीश गवळी व सहकार्यवाह श्री विजय भुरके यांच्या प्रेरणेने कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री संतोष पवार यांनी भूषविले. प्रशालेचे प्राचार्य संतोष पवार व पर्यवेक्षक मकरंद गुर्जर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील संस्कृत विभागाने कार्यक्रमाचे नियोजन केले. 
     सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्रीमद्भगवद्गीतेतील 12 व्या अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले. इयत्ता दहावीतील विद्यार्थी सोहम पांचाळ याने महाकवी कालिदासांची माहिती संस्कृत श्लोक व कथेच्या माध्यमातून अतिशय रसाळ भाषेत सांगितली. कु. पूजा शेलार  व कु. तेजश्री टेकळे यांनी महाकवी कालिदास यांच्याविषयी माहिती सांगितली. 
    प्रशालेतील संस्कृत शिक्षक श्री. गहिनीनाथ बारगजे यांनी महाकवी कालिदास यांच्या साहित्याची ओळख गोष्टीरूपाने  सांगितली व महाकवी कालिदास यांचा जीवनपट उलगडला. पर्यवेक्षक श्री.मकरंद गुर्जर यांनीही विद्यार्थ्यांना महाकवी कालिदासांबद्दल मोलाची माहिती सांगितली. प्रशालेतील कलाशिक्षक धुळाजी देवकाते यांनी सुंदर फलक लेखन केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांच्या सहकार्याने कार्यक्रम आखीव रेखीव व शिस्तबद्ध झाला.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव