जलदिंडी निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
लोणावळा संपादक : संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जलदिंडी प्रतिष्ठान पुणे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये करण्यात आले.
निबंध स्पर्धेसाठी पर्यावरणावर आधारित विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले. 'प्रदूषण कमी करण्यामध्ये माझा सहभाग', 'प्रदूषणाला भविष्य काळातील धोका' आणि 'पर्यावरणीय प्रदूषण व आपले आरोग्य' असे विषय देण्यात आले होते. स्पर्धेसाठी इयत्ता आठवी ते दहावी मधील मराठी व इंग्रजी माध्यमातील 180 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.
विद्यार्थ्यांनी आपले लेखन कौशल्य वापरून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेमधून निबंधाचे लेखन केले. स्पर्धेचे नियोजन पर्यावरण समन्वयक श्री.रामनाथ ढाकणे यांनी केले. स्पर्धेसाठी श्री.संजय पालवे, श्री.महेश चोणगे, श्री.मुकुंद शिंदे आणि श्री.शिवकुमार दहिफळे यांनी सहकार्य केले.
स्पर्धेदरम्यान प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री श्रीनिवास गजेंद्रगडकर आणि पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे यांनी भेट देऊन स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.