भाजे हायस्कूलमध्ये पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

मळवली, संपादक : संजय पालवे 
     आषाढी एकादशी निमित्त विद्या प्रसारिणी सभेच्या भाजे-मळवली येथील श्री विद्या बालक मंदिर तसेच श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार दि. १६ जुलै, २०२४ रोजी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.     संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी व सहकार्यवाह श्री. विजय भुरके यांच्या प्रेरणेने पालखी सोहळा संपन्न झाला. 
     विद्यालयाचे प्राचार्य श्री.संतोष पवार, श्री विद्या बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वाती रगडे, पर्यवेक्षक श्री.मकरंद गुर्जर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील सांस्कृतिक विभागाने पालखी सोहळ्याचे आयोजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज आदी संतांसह वारकऱ्यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. 
    सोहळ्यातील बाल वारकऱ्यांनी ज्ञानोबा-तुकोबांसह हरिनामाचा गजर करीत विद्यालयातून भाजे गावापर्यंत दिंडी काढली. विद्यार्थिनींनी पारंपारिक पोशाख परिधान करीत तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन, मुलांनी हाती झेंडे व खांद्यावर पालखी घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा-तुकाराम व विठ्ठल नामाचा जयघोष करीत अभंग म्हणत पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विद्यार्थी व शिक्षक सर्वांनी फुगडी खेळण्याचाही आनंद लुटला. काही पालक व ग्रामस्थही या सोहळ्यात सहभागी झाले. 
    पालखी पूजन व आरती मुख्याध्यापिका सौ. स्वाती रगडे , प्राचार्य संतोष पवार , पर्यवेक्षक मकरंद गुर्जर, सांस्कृतिक विभाग प्रमुख बाळासाहेब कोकणे, शिक्षक प्रतिनिधी गणेश गायकवाड , शिक्षकेतर प्रतिनिधी जयराम उंबरे यांनी केले. मकरंद गुर्जर, गहिनीनाथ बारगजे, संदीप राऊत, मुकुंद भोसले यांनी पांडुरंगाष्टकम् चे पठण केले. बालक मंदिरच्या शिल्पा आंबेकर , काजल रणदिवे, अनुजा वाघमारे , सीमा सिंह, सुषमा येवले, पूजा मरगळे यांनी पालखी सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रशालेतील कलाशिक्षक धुळाजी देवकाते, विजय कवडे, मुकुंद भोसले यांनी पालखी सजावटीसाठी परिश्रम घेतले. 
      शिक्षक रोहिदास डिकोळे, प्रशांत घाडगे, अश्विनी दुर्गुडे , बाळू शिरसाट व सांस्कृतिक समितीचे सदस्य व सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पालखी सोहळा अतिशय शिस्तबद्ध व मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव