78 वा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा

लोणावळा, संपादक:संजय पालवे
     विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालया मध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा करण्यात आला.   
    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेचे प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर यांनी भुषवले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई टेलर, श्री.राजेश मेहता उपस्थित होते.
      कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वज पूजन करून करण्यात आली. ध्वजारोहण प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे आणि ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सुरेखा परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.
     उपस्थित मान्यवरांना स्काऊट आणि गाईड बँड पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली. संचलन आणि मानवंदनाची तयारी स्काऊट आणि गाईड प्रमुख श्री.संजय पालवे, श्रीमती वैशाली तारू, श्री.ज्ञानेश्वर बुरांडे, श्री.भीमराव राऊत आणि श्री.वैभव सूर्यवंशी यांनी केली. फलक लेखन आणि सजावट कला शिक्षक श्री.महेश चोणगे, श्री.विक्रम शिंदे यांनी केले.
    स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीते, समूहगीते, वैयक्तिक गीते सादर करण्यात आली. श्री.शिवकुमार दहिफळे, श्री.चंद्रकांत जोशी, संस्कृती विभाग प्रमुख श्री.धनंजय काळे, श्री.योगेश कोठावदे आणि श्रीमती वंदना कोळेकर, श्रीमती रेवती बोके, श्रीमती स्नेहलता कांबळे श्रीमती स्वाती व्हरांबळे यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली.
       उपस्थित मान्यवरांमधून शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, शाळा समिती सदस्य श्री.धीरूभाई टेलर, प्राचार्य उदय महिंद्रकर, श्रीमती क्षमा देशपांडे आणि श्रीमती सुरेखा परदेशी यांनी आपले मनोगत सादर केले. त्यांचे मनोगता मधून त्यांनी विद्यार्थ्यांना देशसेवा, आरोग्य, स्वच्छता आणि मातापित्यांचा आदर ठेवण्याचे आवाहन केले. तसेच शिस्तबद्ध कार्यक्रमाचे आणि संचलनातील विद्यार्थ्यांचे विशेष करून कौतुक केले.
     कार्यक्रमा दरम्यान मंचावर उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, शिक्षक प्रतिनिधी श्री.ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर, ज्येष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर, श्री.चंद्रकांत भगत, श्रीमती सविता सिंग, श्रीमती शैलजा लोखंडे, श्रीमती सूर्यवंशी उपस्थित होते.
     कार्यक्रमासाठी आदिवासी शाळेतील प्रशिक्षणार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी स्टेज आणि माईक व्यवस्था श्री.मुकुंद जगताप आणि सहकार्यानी उत्तम केली.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रेवती बोके, श्रीमती वैशाली तारू यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्री.धनंजय काळे यांच्या वंदेमातरम गीताने झाली. https://youtu.be/wae7jC1qCd0?si=ulYQdF444urF-zmG
     

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव