हर घर तिरंगा निमित्त रॅली चे आयोजन

मळवली, संपादक: संजय पालवे 
     विद्या प्रसारिणी सभेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भाजे-मळवली शाळेतर्फे शाळेपासून भाजे गावापर्यंत मा.पंतप्रधान भारत सरकार यांच्या आवाहनानुसार हर घर तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले.
       विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीमध्ये तिरंगी झेंडे घेऊन स्वातंत्र्य दिनाचा विजय असो, हर घर तिरंगा, भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांचा जयजयकार करीत उत्साहाने सहभाग नोंदवला. तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाप्रती आदर व्यक्त करीत प्रतिज्ञा घेतली व देशासाठी हुतात्मा झालेल्या व देश स्वातंत्र्यासाठी झटलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली.
      सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले. प्रशालेचे प्राचार्य श्री.संतोष पवार व पर्यवेक्षक श्री.मकरंद गुर्जर यांच्या नियोजनानुसार क्रीडा शिक्षक श्रीमती अश्विनी दुर्गुडे व श्री.बाळासाहेब कोकणे यांनी रॅलीचे आयोजन केले. श्री.राजेंद्र होले यांनी प्रतिज्ञा सांगितली. इयत्ता पाचवी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव