भव्य बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन

लोणावळा, संपादक : संजय पालवे  
   विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालया मध्ये राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
   शासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेचे केंद्र व्ही.पी.एस होते. सदर केंद्राच्या अंतर्गत 11 प्रशालेमधील बारा ते सोळा वयोगटातील मिळून 2105 विद्यार्थी सहभागी झाले. 
     स्पर्धेतील एकूण स्पर्धकांपैकी 754 स्पर्धक व्ही.पी.एस हायस्कूल मधील होते. स्पर्धेसाठी  प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे गट होते.
     विद्यार्थ्यांना आवडीचे तीन विषय शासनाकडून देण्यात आले होते. भारतीय सण, शेतात काम करणारे आई-वडील आणि मुले आणि खेळणीच्या दुकानांमधील प्रसंग या विषयांवर विद्यार्थ्यांनी सुंदर चित्रे रेखाटली. केंद्र संचालक म्हणून कलाशिक्षक श्री.चंद्रकांत जोशी यांनी काम पाहिले. स्पर्धा पार पाडण्यासाठी श्री.संजय पालवे, श्री.पोपट राहिंज, श्री.हरिभाऊ कुलकर्णी, श्री.जयवंत सिसोदे आणि प्रशालेतील शिक्षक आणि श्री.रामदास भोसले, श्री.प्रकाश आढाव या सेवकांनी मोलाचे सहकार्य केले.
     मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल आणि सहभागी विद्यार्थ्यांचे शालेय समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर आणि ज्येष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर यांनी कौतुक केले.

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव