रक्षाबंधना निमित्त वृद्धाश्रमाला भेट
लोणावळा, संपादक : संजय पालवे विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालयातर्फे दरवर्षी रक्षाबंधनानिमित्त लोणावळा परिसरातील पोलीस स्टेशन, पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा आणि अंधवृद्धाश्रम या ठिकाणी भेटी देऊन रक्षाबंधन साजरे केले जाते.
या वर्षी प्रशालेच्या स्काऊट आणि गाईड विद्यार्थिनींनी वरसोली येथील स्वामी रामानंद ट्रस्टलां भेट दिली. तेथील वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना राख्या बांधल्या आणि मिठाईचे वाटप करून रक्षाबंधन साजरे केले.
आश्रमातील जवळपास ऐंशी आजी - आजोबांना राख्या बांधून विद्यार्थिनींनी त्यांचे आशीर्वाद घेतले. आजी-आजोबांनी देखील विद्यार्थ्यांना भरभरून आशीर्वाद दिले.
विद्यार्थिनींनी राख्या बांधल्यानंतर आजी-आजोबांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू वाहताना दिसले. शाळेने घेतलेल्या उपक्रमाबद्दल स्वामी रामानंद ट्रस्टचे सचिव कुकरेजा आणि आजी-आजोबांनी शाळेचे आभार मानले.
कार्यक्रमाचे नियोजन स्काऊट लीडर श्री. संजय पालवे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, गाईड कॅप्टन श्रीमती वैशाली तारू, प्रशालेच्या शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर, ज्येष्ठ लिपिक श्री.कुंडलिक आंबेकर आणि श्री.राजू खांडेभरड उपस्थित होते.
अनोख्या उपक्रमाबद्दल नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालीनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा प्रशासन यांचे कौतुक केले. https://youtu.be/gY8pfHB1Htk?si=w_GRNcc3SQVg24rC