शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार
नुकतीच बदलापूर या ठिकाणी झालेली घटना आणि देशाच्या विविध राज्यांमधील शाळकरी मुली वरती होणारे अत्याचार याच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता सर्व शाळांना सीसीटीव्ही कॅमेराचे बंधन करणे आवश्यक आहे.
जेणेकरून दुष्कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा होऊ शकते. किंवा अशा प्रकरांवर पूर्णपणे निर्बंध येऊ शकतो. आपण सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद होऊ याची भीती बाळगून तरी असले घाणेरडे प्रकार थांबले जातील आणि समाजातील छोट्या मुलींपासून तर वृद्ध स्त्रियांपर्यंत सर्वांनाच अभय मिळेल.
बदलापूर मधील घटनेमुळे पालकांच्या मनामध्ये एकंदरीत भीतीचे वातावरण आहे. आपली मुलगी कशी सुरक्षित राहील याकडे सर्वांचे लक्ष आहे. यामुळे सर्व शाळांनी आपल्या शालेय परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसून त्याचे फुटेज जतन करून ठेवणे गरजेचे आहे आणि असा हट्ट पालकांनी धरावयास हवा.
जय हिंद.....