स्वच्छ, सुंदर आणि नशामुक्त लोणावळा निमित्त रॅलीचे आयोजन

लोणावळा, संपादक : संजय पालवे 
     लोणावळा देशातीलच नव्हे तर जगभरातील निवडक प्रेक्षणीय स्थळा पैकी एक आहे. परंतु परिसरामध्ये दिवसेंदिवस काही अप्रिय घटना घडल्यामुळे लोणावळा पोलीस ग्रामीण विभागातर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
     रॅलीमध्ये लोणावळा परिसरामध्ये राहणारे  जेष्ठ नागरिक, समाजसेवक, विविध संस्था, तरुण-तरुणी आणि लोणावळा परिसरामधील शैक्षणिक संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
     'संकल्प नशामुक्ती अभियान व सुरक्षित पर्यटन मोहीम' संकल्पना घेऊन लोणावळा मधील कुमार रिसॉर्ट पासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये जनजागृतीसाठी विविध विषय एकत्रित करून पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. रॅली श्री.सत्यसाई कार्तिक सर (सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
     त्याचबरोबर रॅलीमध्ये श्री.सुहास जगताप (पोलीस निरीक्षक लोणावळा), श्री.किशोर धुमाळ (पोलीस निरीक्षक लोणावळा), श्री. रवींद्र पाटील (पोलीस निरीक्षक कामशेत), श्री.कुमार कदम (पोलीस निरीक्षक वडगाव) सहभागी होते.
    व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयाला रॅलीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. शाळा समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य श्री.उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक श्री.विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने आणि स्काऊट शिक्षक श्री.संजय पालवे, श्री.योगेश कोठावदे यांच्या नेतृत्वाखाली प्रशालेतील स्काऊट आणि गाईड तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रॅली मध्ये  सहभाग घेतला.            https://youtube.com/shorts/id8oldY6v9o?si=Q-85OswbX9gAhQTP

     

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव