शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन होणार....
लोणावळा,
लोणावळा येथे नुकताच पार पडलेल्या सभेद्वारे पोलीस प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयाला मार्गदर्शक सूचना करण्यात आले.
बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेमुळे शासन आणि पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा आणि महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि सामाजिक संस्था यांना एकत्रित बोलून पोलीस यंत्रणेद्वारे मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहे.
लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सत्यसाई कार्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा परिसरातील शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची एकत्रित सभा पार पडली
सभेमध्ये कार्णिक सरांनी म्हणाले की, शाळेचे मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्याच्या सूचना केल्या तसेच शाळेमध्ये तक्रार पेटी, सीसीटीव्ही कॅमेरे, शालेय स्तरावर स्वयंसेवक, अल्पवयीन विद्यार्थ्यांना दुचाकी आणण्यस बंदी करणे, मोठ्या शाळा आणि महाविद्यालय मध्ये विद्यार्थी तपासणी करण्यात यावी जेणेकरून विद्यार्थी आपल्या सोबत तंबाखू, गुटखा, सिगारेट सारख्या वस्तू आणणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
कार्णिक सरांनी पोलीस प्रशासनाची जबाबदारी सांगताना असे नमूद केले की, शाळेच्या बाहेर पोलीस यंत्रणेद्वारे पेट्रोलिंग करण्यात येईल तसेच शाळेच्या आसपास पोलिसांची ग्रस्त असेल यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. शालेय व्यवस्थापन समितीने भरीव कार्य करावे असेही सरांनी शेवटी नमूद केले.
सभेसाठी श्री.सत्यसाई कार्णिक(सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा),श्री.किशोर धुमाळ (पोलीस निरीक्षक लोणावळा),श्री.कुमार कदम (पोलीस निरीक्षक वडगाव), श्री.राहुल लाड (सहायक पोलीस निरीक्षक),श्री.सागर चटके (वनविभागीय अधिकारी) उपस्थित होते