गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न....

    
    विद्या प्रसारिणी सभेने एस.एस.सी आणि एच.एस.सी बोर्ड परीक्षेमध्ये 85% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा शिवाजीनगर येथील रमा रमण कार्यालयामध्ये आयोजित केला.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.डॉ.वा.मा.औटी (अध्यक्ष विद्या प्रसारिणी सभा पुणे 5), प्रमुख पाहुणे श्री.डॉ.भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद पुणे), मुख्य प्रमुख उपस्थिती श्रीम.डॉ. मृणालिनी गरवारे (अध्यक्षा नियामक मंडळ विद्या प्रसारिणी सभा), श्री.डॉ.सतीश गवळी (कार्यवाह), श्री.विजय भुरके (सहकार्यवाह) उपस्थित होते.
     कार्यक्रमासाठी डॉ.हिरेन निरगुडकर, श्री. अरविंद मेहता, श्री.कन्हैया भुरट, श्री.दिलीप सराफ,श्री.भगवानभाऊ आंबेकर (व्ही.पी.एस शाळा समिती अध्यक्ष) ॲड.संदीप अगरवाल, श्री.प्रमोद कुदळे श्री.केशव कुलकर्णी नियामक मंडळातील सदस्य उपस्थित होते, तसेच श्री.धीरूभाई टेलर (शाळा समिती सदस्य व्ही.पी.एस.लोणावळा) उपस्थित होते.
     विविध विद्याशाखेंमधून 85% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या जवळपास 40 विद्यार्थ्यांचे  कौतुक करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कुमारी सुप्रिया भानवसे (व्ही.पी.एस हायस्कूल लोणावळा) विद्यार्थिनीने एस.एस.सी बोर्ड परीक्षेमध्ये (93.20%) गुण मिळवून सर्व विद्याशाखां मधून प्रथम क्रमांक पटकावला, कुमारी रसिका जोशी (भारत इंग्लिश स्कूल शिवाजीनगर पुणे) विद्यार्थिनीने एच.एस.सी बोर्ड परीक्षेमध्ये( 93.50%) मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.
     विद्या प्रसारिणी सभेतर्फे सर्व शाखांमधून एस.एस.सी आणि एच.एस.सी बोर्ड परीक्षा मध्ये सर्वांत जास्त निकाल लागणाऱ्या विद्या शाखेला फिरता करंडक बहाल केला जातो.  यंदाचा हा मान भारत इंग्लिश स्कूल शिवाजीनगर पुणे आणि व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता कनिष्ठ महाविद्यालय लोणावळा यांना मिळाला. संबंधित विद्या शाखांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फिरता करंडक बहाल करण्यात आले. 
     प्रमुख पाहुणे डॉ.भाऊसाहेब कारेकर, डॉ. मृणालीनी गरवारे आणि अध्यक्ष डॉ.वा.मा.औटी यांनी आपली मनोगते सादर केली. मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना अपार कष्ट करणे, प्रामाणिकपणा आणि देशावरचे प्रेम आबाधीत ठेवणे असा संदेश दिला.
     कार्यक्रमासाठी विविध शाखेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     सूत्रसंचालन श्रीमती वर्षा कुलकर्णी तर पाहुण्यांचा परिचय डॉ. सतीश गवळी (कार्यवाह) यांनी उपस्थितांना करून दिला. कार्यक्रमाची सांगता श्री.धनंजय काळे यांच्या पसायदानाने झाली.  https://youtu.be/GutZtH0BFss?si=ZqpLdPAs5AWXYYIi

Popular posts from this blog

व्ही.पी.एस मध्ये ८०वा स्वातंत्र दिन साजरा

व्ही.पी.एस मध्ये दीप अमावस्या साजरी

विद्यार्थ्यांनी घेतला अध्यापनाचा अनुभव