विद्यालयात दहीहंडी उत्सव साजरा
लोणावळा, संपादक : संजय पालवे
विद्या प्रसारिणी सभेचे व्ही.पी. एस. प्राथमिक विद्यालय लोणावळा शाळेत दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. रंगीबेरंगी पोषाखात नटलेले राधा-कृष्णाच्या वेशातील चिमुकले, विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी. विविध गाण्यांचा गजर, हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष अशा उत्साही वातावरणात विद्यालयात विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंगल जाधव होत्या. गोपालकाल्याचे महत्व आणि माहिती श्री.प्रकाश पाटील व श्री.संजय भालचिम यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.शाळेतील सर्व विद्यार्थी गोविंदा आला रे आला यासारख्या गाण्यावर नृत्य करत दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. कार्यक्रमात चिमुकल्यांसह शिक्षकही उत्साहाने सहभागी झाले होते.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह श्री.डॉ.सतीश गवळी सर, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके , शाला समिती अध्यक्ष श्री अरविंदभाई मेहता, नियामक मंडळ सदस्य श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना दहीहंडी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक श्री. संजय भालचिम, श्री.प्रकाश पाटील, श्री.हनुमंत शिंदे,श्री.अमित रसाळ,शिक्षिका सौ. मनिषा जरग , सौ.सुनिता वरे, सौ.लीना निकम, सौ.कविता पुंगडवाले, सौ.संगिता पाटील,सौ.प्राजक्ता दिवसे,श्रीमती. स्वप्नाराणी भालेराव, शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती.जयश्री बागलकोटे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. संजय भालचिम यांनी केले तर आभार सौ. प्राजक्ता दिवसे यांनी मानले...